नसरापूरमध्ये महिला दिनानिमित्त तायक्वांदो स्पर्धा उत्साहात; खेळाडूंना विविध पुरस्कारांनी गौरव


मंगेश पवार

नसरापूर : विघ्नहर्ता सेवा प्रतिष्ठान व अखिल नसरापूर ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त आयोजित ‘युनिक तायक्वांदो फाउंडेशन चॅम्पियनशिप 2026’ स्पर्धा रविवारी (दि. 22 मार्च) कुंभारकर लॉन्स, नसरापूर येथे उत्साहात पार पडली.

या स्पर्धेचे उद्घाटन महिला पोलीस, महिला वनरक्षक, महिला वकील, महिला आरोग्य विभागातील प्रतिनिधी तसेच सामाजिक कार्यकर्त्या पुनम मांगले, विद्या गेंगजे, प्रिया वायदंडे, मनीषा चौधरी, वैष्णवी ढाळे, बिराजदार मॅडम, अनुराधा कदम, अक्षदा तिखाळे, स्मिता विभुते, मधुरा शेटे, अनिता गोळे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेत विविध गटांतील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत ‘बेस्ट फायटर’ पुरस्कार पटकावले. काव्या चव्हाण (शिवापूर), तन्वी पांगारे (दिवळे), रेणू यादव (पळशी, खंडाळा), अर्णव भगत (नसरापूर), वेदांत पिसाळ (पळशी, खंडाळा) व आरोही कानडे (पळशी, खंडाळा) यांना प्रत्येकी 1111 रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. तसेच परिणीता डिंबळे, कृष्णा शेटे, पूर्वा मेमाने, मनस्वी गिऱ्हे व आदित्य खाटपे यांना बेस्ट फायटर ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

ग्रुप स्पर्धेत नसरापूर क्लबने प्रथम क्रमांक पटकावत 11,111 रुपयांचे पारितोषिक मिळवले, तर दिवळे क्लब (द्वितीय – 7,777 रु.), शिवापूर क्लब (तृतीय – 4,444 रु.) व कापूरहोळ क्लब (चतुर्थ – 3,333 रु.) यांनी अनुक्रमे पुढील क्रमांक मिळवले. ‘लिटिल एंजल्स इंग्लिश मीडियम स्कूल, पळशी’ यांना बेस्ट क्लब ट्रॉफी प्रदान करण्यात आली.

ADVERTISEMENT

या स्पर्धेसाठी अनेक दात्यांनी उदार हस्ते मदत केली. अनिता गोळे (4,444 रु.), डॉ. सविता डिंबळे (3,333 रु.), मधुरा शेटे (3,333 रु.), वैशाली झोरे व स्मिता विभुते (प्रत्येकी 15 ट्रॅक सूट), विशाल शिंदे (30 टी-शर्ट), रेखा गिऱ्हे (2,222 रु.), प्रज्योत कदम (4 मोठ्या ट्रॉफी), गुंजन कदम व नंदकुमार काजळे (प्रत्येकी 2 ट्रॉफी), सुधीर वाल्हेकर (6 ट्रॉफी) तसेच अर्चना वाघमारे, अजर तांबोळी, ज्योती चव्हाण, धनंजय गायकवाड, उषा कदम यांनी प्रत्येकी 10 सन्मानचिन्हे दिली.

विजेत्या खेळाडूंना सुनिता ताई चंद्रकांत बाठे यांच्या वतीने मेडल देण्यात आले. तसेच शलाका कुलदीप कोंडे यांनी 5,000 रुपयांची आर्थिक मदत केली, तर अजिंक्य हाडके यांनी खेळाडूंना खाऊ वाटप केले.

स्पर्धेचे बक्षीस वितरण चंद्रकांत बाठे, लखन दळवी, हेमंत भरगुडे , किरण बदे (पत्रकार), विशाल शिंदे पत्रकार,धनंजय भोसले (वसुंधरा फाउंडेशन), गणेश दळवी, सुरेश काळे, नंदकुमार काजळे, अथर्व वनारसे, अक्षय कदम, गुंजन कदम, धनंजय गायकवाड, ज्योती चव्हाण, उषा कदम, वैशाली झोरे व सुधीर वाल्हेकर आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या स्पर्धेमुळे परिसरातील खेळाडूंना आपली क्रीडा कौशल्ये सादर करण्यासाठी उत्तम व्यासपीठ मिळाले असून, महिला दिनानिमित्त महिलांच्या सहभागाला विशेष प्रोत्साहन मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!