श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र महाड नाका भोर वतीने १२ वी च्या विद्यार्थी ना शुभेच्छा
भोर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी शुभेच्छा देण्याचा उददे्शाने मंगळवार दि.११/०२/२०२५ पासुन १२ वी ची परीक्षा सुरू होत असून
भोर तालुका माध्यमिक शिक्षक संघ चे अध्यक्ष रमेश बुदगुडे
व श्री स्वामी समर्थ भोर सेवा केंद्र चे स्वामी सेवेकरी संतोष कदम
यांनी राजगड ज्ञानपीठ चे अंनतराव थोपटे महाविद्यालय येथे परिक्षेसाठी आलेल्या विद्यार्थी ना शुभेच्छा दिल्या.
12 वी म्हणजे आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा वळणाचा मार्ग. सगळ्या परीक्षार्थींना परीक्षेच्या वेळी खूपच ताण आलेला असतो. परीक्षेमध्ये नक्की काय प्रश्न येतील आणि आपल्याला पुढे कसे गुण प्राप्त होतील या तणावाखाली विद्यार्थी असतात.
परीक्षेअगोदर केलेल्या तुमच्या सर्व मेहनतीला योग्य असा गुणरूपी पुरस्कार मिळावा.
आपली गुणवत्ता दर्शविण्यासाठीच परीक्षा असते
त्यामुळे न घाबरता न टेन्शन घेता न कोणत्याही चुकीचे पध्दतीने काँफी न करता उत्तमरित्या उत्तीर्ण होताल अशा परीक्षेसाठी शुभेच्छा
रमेश बुदगुडेव संतोष कदम यांनी दिल्या.यावेळी स्वामी सेवेकरी कोलत, अर्जुन पोठभरे उपस्थित होते.


