पांडे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सत्कार.
दि. ५ सारोळे : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन संपूर्ण पुणे जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शिक्षकांचा सत्कार आणि समाजातील शिक्षकांच्या भूमिकेवर प्रकाश टाकणारे इतर उपक्रम भोर तालुक्यातील पांडे गावात दरवर्षी दि. ५सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केले जातात.
शैक्षणिक क्षेत्राला समृद्ध करण्यात अतुलनीय योगदान दिल्याबद्दल पांडे ग्रामपंचायतिकडून शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
या प्रसंगी सरपंच तेजस साळुंके यांनी शाळेतील सर्व शिक्षकांचा सत्कार केला.
यावेळी बोलताना सरपंच तेजस साळुंके म्हणाले की,शिक्षक हे खरे राष्ट्रनिर्माते आहेत आणि हा दिवस समाजाला त्यांचे आभार मानण्याची आणि त्यांचे योगदान ओळखण्याची संधी देतो.
सहभागी ग्रामपंचायत सदस्य यांनीही आपल्या जीवनातील शिक्षकांच्या भूमिकेबद्दल आपले विचार मांडले. यापुढे असेच कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे सांगितले.


