संदीप सिंह गिल प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी असा प्रवास .
आयपीएस अधिकारी संदीप सिंह गिल यांचा महाविद्यालयातील प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी असा त्यांचा प्रवास राहिला यशाचा प्रवास करीत असताना त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले पण जिद्दीच्या जोरावर त्यांनी यशाला चांगलीच गवसणी घातली आहे, संदीप सिंह गिल यांची मातृभूमी पंजाब आहे, एका खेडेगावातील शेतकरी कुटुंबातील जन्म कुटुंबाची परिस्थिती जेमतेम त्यात वडिलांचे लहानपणीच छत्र हरपलेले असल्यामुळे परिस्थिती जाणीव ही लहानपणीच झाली होती, शाळेत पहिल्यापासूनच हुशार पण दहावी झाल्यानंतर पुढे काय? काहीच माहिती नव्हते स्थानिक भाषेतील शिक्षणामुळे इंग्रजीचा पुरेसा गंध नव्हता, महाविद्यालयीन शिक्षण सुरू केल्यानंतर इंग्रजी भाषा येत नसल्यामुळे कमीपणा वाटू लागला शिक्षकांचा शब्द मनाला लागला, आणि काही करून इंग्रजी भाषा शिकायचीच असं मनाशी चंग बांधला पुढे अभ्यास करून जिद्दीच्या जोरांवर इंग्रजी विषयाचे प्राध्यापक झालो, ( शेतकरी कुटुंब ) संदीप सिंह गिल यांचे बालपण हे एकत्रित कुटुंबात गेले लहानपणापासूनच शेतीमध्ये विविध कामे करावी लागत असत, वयाच्या सातव्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधंन झाले आईच्या मार्गदर्शनाखाली लहानाचे मोठे झाले होते, काहीतरी करून दाखवण्याची पहिल्यापासून जिद्द होती, अनेक मर्यादा येत असतात पण मर्यादांना ओलांडून यश खेचून आणण्याचे मनी स्वप्न होते, शाळेतील कामे करण्यात वेळ जात असे, लहानपणापासूनच मोठमोठी कामे करायची सवय लागली होती, या कामामुळेच हळूहळू घडत गेल्याचे संदीप सिंह गिल यांनी सांगितले आहे, त्यामुळे आज प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी असा प्रवास मी करीत आहे, महाराष्ट्र पोलीस खात्यात कर्तव्यदक्ष अन् शिस्तप्रिय आयपीएस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

