पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत आरोपींच्या वारजे माळवाडी पोलिसांनी आवळल्या मुसक्या, पिस्तूल व 2 जिवंत काडतुसे हस्तगत, गुन्हे शाखेची कामगिरी,


संभाजी पुरीगोसावी (पुणे शहर) प्रतिनिधी.

ADVERTISEMENT

देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारांला वारजे माळवाडी पोलिसांनी कर्वेंनगर भागातून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईगंडे गणेश शाखा विनोद तीनशे पोलीस निरीक्षक रंगराव पवार पोलीस निरीक्षक निलेश बडाख त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे कुणाल सचिन घावरे (वय 28 ) रा. बोराटे कॉलनी कर्वेनगर) असे आरोपींचे नाव आहे, कर्वेनगर तसेच वारजे माळवाडी भागात गुन्हे शाखा युनिट टीमचे पथक गस्त घालत होते, तेव्हा कर्वेंनगरमधील डीपी रस्त्यावर घावरे थांबला होता, त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती पोलीस कर्मचारी प्रतीक मोरे यांना मिळाली होती, या माहितीची खातरमजा केली नंतर पोलीस पथकांने या भागात सापळा लावून सराईत आरोपी कुणाला घावरेच्या मुसक्या आवळल्या आहेत तर झडतीत त्याच्याकडून पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला, आरोपी घावरे याच्यावर बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त संभाजी कदम सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे भाऊसाहेब पठारे यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईगंडे व पोलीस निरीक्षक रंगराव पवार पुणे पोलीस निरीक्षक निलेश बडाख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे पोलीस अंमलदार विनोद भांडवलकर विनोद जाधव गणेश सुतार हरीश गायकवाड प्रतीक मोरे आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला,


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!