खंडाळा पंचायत समिती व जिल्हा उद्योग केंद्र सातारा यांच्या संयुक्त विद्यमानाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम संपन्न.


 

लोणंद प्रतिनिधी : दिलीप वाघमारे

 

पंचायत समिती खंडाळा येथे मा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा परिषद सातारा व मा प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सातारा यांचे संकल्पनेतून मा गट विकास अधिकारी पंचायत समिती खंडाळा यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती खंडाळा व जिल्हा उद्योग केंद्र सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. २१ रोजी वटपौर्णमेच्या सणाचे औचित्य साधून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP,PMEGP, ) अंतर्गत वैयक्तिक कर्ज प्रस्ताव मेळावा उपस्थित महिलाना रोपांचे वितरण,तसेच आरोग्य विभागामार्फत मोफत आरोग्य तपासणी अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते.

ADVERTISEMENT

 

सदर मेळाव्यात एकुण 221 महिला उद्योजिका यांचे परिपुर्ण कर्ज प्रस्ताव तयार करण्यात आले. सदर मेळाव्यात मा.अनिलकुमार वाघमारे गटविकास अधिकारी पंचायत समिती खंडाळा यांनी लाभार्थी उद्योजक महिलांना विस्तृतपणे मार्गदर्शन केले.मा उमेशचंद्र दंडगव्हाळ जिल्हा महाव्यवस्थापक DIC सातारा यांनी महिलांच्या अडचणी समजून घेवून शंका निरसन केले . सदर मेळाव्यास मा नितीन तळपे अग्रणी बँक व्यवस्थापक सातारा, मा. अंकुश मोटे जिल्हा अभियान व्यवस्थापक अंकुश मोटे , मा. रंजनकुमार वायदंडे DM FI , नितिराज साबळे FLC सातारा,जिल्हा उद्योग केंद्राचे जवळगे सर व्यवस्थापक, श्री ओंकार कोंडे, प्रशांत जमदाडे उद्योग निरिक्षक , पवार मॕडम ,प्रविण खुडे Hotels अभियान व्यवस्थापक खंडाळा, काशिनाथ कुंभार, राजेश चव्हाण BM MIS रेश्मा धायगुडे प्रभाग समन्वयक, मनोज माने Block Anchor, तसेच सर्व केडर व महिला उद्योजिका लाभार्थी यांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!