नसरापूर गावातील शिंदे कॉलनीत वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरा.


 

नसरापूर ( ता. भोर ) येथील शिंदे कॉलनी, वनविहार, चांदनी महाल, राममंदिर, मेनआळी आदी परिसरातील महिलांनी शुक्रवार दि. २१ रोजी मोठया उत्सहात वटपौर्णिमा साजरी केली. आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करण्यात आली. काही महिलांनी घराच्या जवळ वडाची पूजा केली. बऱ्याच महिलांनी घरातच पतीराजाची पूजा करून जन्मोजन्मी हाच पती मिळू देत अशी प्रार्थना केली. महिलांनी एकमेकींना सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या.

ADVERTISEMENT

 

 

नसरापूर येथील शिंदे कॉलनीमधील कल्पना शिंदे, नयना पुरोहित, गौरी वनारसे, रूपाली शिंदे, रोहिणी गोरे, प्रमिला शेटे, वर्षा पुरोहित, सुजाता वनारसे, अश्विनी कदम सुचिता वनारसे आदी महिलांनी वटपौर्णिमा साजरी केली. निसर्गतःच दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असल्याचे ज्येष्ठ महिला कल्पना बाळासाहेब शिंदे यांनी सांगितले.

 

दरवर्षीच ते नटणं…घोळक्यांत एकमेकींसोबत वडाला जाणं…सकाळपासूनची ती सणाची लगबग…घरात गोडाचा सुगंध.. त्यात वटपौर्णिमेचा महिलांचा साज आणि ती नऊवारी साडी अशा सर्वच परंपरा जपत नसरापूर परिसरातील महिलांनी मोठ्या हौसेने वटपौर्णिमा साजरी केली.

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!