सारोळे पोस्ट कार्यालय मध्ये नियोजनांचा अभाव ; अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना तासंनतास प्रतीक्षा.
‘‘शासन नेहमीच ज्येष्ठ नागरिकांना,महिला यांना सुविधा देत असे. परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना शासन कमी पडते. सारोळे पोस्ट कार्यालयात आर्थिक व्यवहार, “लाडकी बहीण योजना ” या योजनेचे पेमेंट काढण्यासाठी ज्येष्ठ आणि महिला मोठ्या प्रमाणात सारोळे पोस्ट ऑफिस मध्ये गर्दी करत आहेत.पण पोस्ट ऑफिस ची सकाळी ९ते २अशी वेळ असताना देखील पोस्ट सकाळी १० ते ११. ३० बंद असल्या कारणाने नागरिकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे, आणि महिला वर्गाची गैरसोय होत आहे. पोस्टात दोन कर्मचाऱ्यांची गरज असतानाही एक कर्मचारी काम करत असल्याने एकावरती कामाचा अतिरिक्त लोढ येत आहे
कोणत्याही बँकेत एवढी लाईन, एवढा वेळ लागत नाही, पण पोस्टातील एक व्यवहार म्हणजे कमीतकमी दोन तास लाईनला उभे राहावे लागते.
याबाबत आमच्या संपादकांनी पोस्ट ऑफिस अधिकारी पठाण मॅडम यांना दूरध्वनी द्वारे संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, “भरती प्रक्रिया चालू आहे” तोपर्यंत तुम्हाला ऍडजेस्ट करावे लागेल
असे बोलून टोलवाटोलवीची उत्तरे दिली.

 
			

 
					 
							 
							