महाराष्ट्राने प्रेरणा घ्यावी असे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील चोरांबे गाव


 

पुण्यभुमी प्रतिनिधी सातारा : बजरंग चौधरी

 

जावळी ( चोरांबे ) : अखंड हिंदुस्थानावर आधिराज्य गाजवणार्या राजधानी सातारला जसा ज्वलंत व जीवंत इतिहास आहे अशा शुरविरांच्या जिल्ह्यातील माणसं जशी स्वकष्टातून उभी राहिलेली असतात तशीच काही गाव आजही छत्रपतींचे प्रेरणादायी नेतृत्व मान्य करीत, त्यांच्या विचारांचा वारसा जपत व पाठिंबा देत कष्ट उपसतात आणि या सगळ्याच्या एकत्रित प्रयत्नातून उभं राहातं एक आदर्श गाव. अशाच कष्टातून उभ्या राहिलेल्या आणि विकासाच्या उर्जेने स्वंयप्रकाशित झालेल्या राजधानी सातारा जिल्ह्यातील

जावळी खोर्यातील आदर्श घ्यावा असे विजयजी सपकाळ यांच्या प्रयत्नातुन उभ्या महाराष्ट्राने प्रेरणा घ्यावी असे “चोरांबे गावं”

संत गाडगेबाबा यांच्या प्रेरणेतुन स्वर्गीय आर आर पाटील यांनी ग्रामस्वच्छता अभियान महाराष्ट्रात सुरू करुन सबंध देशाला दिशा दिली. त्याच पावलावर पाऊल ठेवून चोरांबे गावातील तरुणांनी तसेच ग्रामस्थांनी एकत्र येऊन स्वच्छतेवर भर दिला. गाव लहान पण विकास कामात गतिमान आहे. या गावाने विकास कामांचा डोंगर रचत परिसरात जणु इतिहासच घडविला. “स्वच्छ गाव सुंदर गाव” या कल्पनेवर भर देऊन समाजात वेगळी ओळख तयार करत आहेत. सुरळीत रस्ते, स्वच्छ नाले, स्वयंरोजगार, बचतगट, मुलगी वाचवा मुलगी शिकवा, तंटामुक्ती, रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष व स्वच्छतेचे संदेश फलक, बंदिस्त गटारे, पेवर ब्लॉक, एवढच नव्हे तर गावांमध्ये आठ लाख लिटरची पाण्याची टाकी असुन गावकर्यांच्या सुरक्षिततेकरता संपूर्ण गाव CCTV कक्षेतही आहे, जिल्हा परिषदेची डिजिटल शाळा, असे अनेक उपक्रम अगदी वाद विवाद न करता विचार विनिमयातुन राबवले जातात.

 

पर्यावरणाचा समतोल राखण्याकरता हातभार लावणे ही जबाबदारी समजुन

जलसंधारणाच्या कामांमध्ये वृक्ष लागवड व त्यांचे संवर्धनही केल जाते “पाणी आडवा पाणी जिरवा”,ओढा रुंदीकरण व खोलीकरण, बंधारे बांधकाम, तलाव खोलीकरण व रुंदीकरण, सौर ऊर्जा चे दिवे, बायोगॅस सयंत्र, विहिरीचे पुनर्भरण, वनराई, सांडपाणी व्यवस्थापन.

या योजना लोकसहभागातून केल्या जातात. पाणी स्त्रोताचे बळकटीकरण करण्याकरीत गाव पाण्याच्या दृष्टीने स्वंयपूर्ण केले. डीप सी सी टी, अनगड बांध सी सी टी, आरोग्य शिक्षण, महिला समक्षीकरण, गावातील स्वच्छता, निर्मल शौचालय, शोष खड्डे, घनकचरा व्यवस्थापन, व्यसनमुक्ती, दारूबंदी इत्यादी दरवर्षी विविध शिबिरांचे आयोजन, तसेच यंदा कोरोना COVID च्या महामारी मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन, असे विविध उपक्रम गावांमध्ये राबवले जातात.

ADVERTISEMENT

कोरोना या महामारी काळात श्री विजयजी सपकाळ यांनी गाव हे आपलं घर समजुन कर्ताव्यक्तीची जबाबदारी पार पाडत कोरोनायोद्ध्याचे रात्रंदिवस काम केलं तसेच शरीर व आरोग्यदायी विचार करता गावामधे खुली व्यायामशाळा (open gym)ची यशस्वी सुरवात केली

 

दर आठवड्याला श्रमदान घेतले जाते यामध्ये महिला 100% सहभागी असतात. तसेच लोकवर्गणीतून गावामध्ये भरपूर विकास कामे झाली आहेत. गावाची सामाजिकता व गावाची एकी ही गावाची खरी ताकद आहे. या गावचे सुपुत्र जावली तालुक्याचे माजी आमदार श्री सदाभाऊ सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कामे केली जातात

या गावांमध्ये लोकवर्गणीतून चाळीस लाखाचे श्री पद्मावती देवीचे सुंदर मंदिर गावाच्या विकासाची शान आहे. हे ग्रामदैवत साठ गावचे श्रद्धास्थान आहे. तसेच या गावाचे एक वैशिष्ट्य म्हणजे या गावात पूर्वीपासून रॉकेल जाळले जात नाही व महत्त्वाचे म्हणजे गावांमध्ये कोणाच्याही घरी गणपती न बसविता लोकमान्य टिळकांनी चालू केलेला एक गाव एक गणपती असा आदर्श उपक्रम गावामध्ये गेली चाळीस वर्षे राबविला जात आहे. चोरांबे गावामध्ये आत्तापर्यंत विविध मान्यवरांनी भेट दिले आहे. यामध्ये पद्मश्री आदर्श गाव हिवरे बाजारचे आदर्श सरपंच श्री पोपटराव पवार, महाराष्ट्र राज्याचे सचिव माननीय श्रीयुत गोयल सो., जलस्वराज्य प्रकल्प पाहण्यासाठी अमेरिका व अफगाणिस्तान वरून जागतिक बँकेचे प्रतिनिधी गावची पाहणी करण्यासाठी आले होते. जिल्हा परिषद सातारा माजी कार्यकारी अधिकारी व आत्ताचे पालघर डहाणू चे जिल्हाधिकारी (कलेक्टर) माननीय कैलास जी शिंदे, उपसंचालक भूजल सर्वेक्षण पुणे विभाग माननीय मिलिंद देशपांडे, दैनिक सकाळ चे संपादक आणि ॲग्रोवन वर्तमानपत्र पुणे विभाग माननीय संदीप नवले इत्यादी मान्यवरांनी गावात भेट देऊन गावचे कौतुक केले आहे. गावाच्या विकासामध्ये माजी आमदार सदाशिव भाऊ सपकाळ, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, व ग्रामपंचायतीतील सर्व सदस्य, ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ तरुण मंडळ मुंबईकर, पुणेकर या सर्वांचा सिंहाचा वाटा आहे.

चोरांबे गावाची ही सकारात्मक एनर्जी इतरांनाही मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरत असून यशाने हुरळून न जाता साध्य केलेला विकास टिकून कसा राहिल, नवीन काय प्रगती करता येईल याचा गावाला आणि गावकऱ्यांना सतत ध्यास असल्याने चोरांबे गाव विकासात अग्रेसर आहे आणि राहील यात शंका नाही.

भारताच्या स्वतंत्र्य लढ्यात सातारा जिल्ह्याचा मोठा हातभर लाभला असुन समाजहिताकरता लढा देण्याची परंपरा असलेल्या या मातीतील माणसं श्री विजयजी सपकाळ यांच्या रुपानं आजही समाजाला प्रेरणा देण्याच काम करतात हे या मातीतील भाग्य आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!