खंडाळा तालुक्यातील कराडवाडीमध्ये विजेचा कहर — सोनाली कराडे यांचा दुर्दैवी मृत्यू


 

संपादक : दिलीप वाघमारे

सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील कराडवाडी येथे ३० मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास निसर्गाचा भीषण रौद्ररूप पाहायला मिळाला. ढगांचा प्रचंड गडगडाट, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह सुरू झालेल्या अवकाळी पावसाने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

याच दरम्यान, कराडवाडी येथील सोनाली कराडे या महिलेच्या अंगावर अचानक वीज कोसळली. या भीषण घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या. स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवले, मात्र उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

ADVERTISEMENT

या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण कराडवाडी परिसरासह खंडाळा तालुक्यात शोककळा पसरली आहे. सोनाली कराडे यांच्या निधनामुळे गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून, त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नागरिकांना आवाहन

अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विजांचा कडकडाट सुरू असताना उघड्या मैदानात, झाडाखाली किंवा विजेच्या खांबाजवळ थांबणे टाळावे, असेही सूचित करण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!