उघडा मारुती जागृत देवस्थान तर्फे हनुमान जन्मोत्सव निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन


दिलीप वाघमारे

ADVERTISEMENT

अल्पावधीत नावारूपाला आलेले तसेच पुरंदर, बारामती ,फलटण, वाई ,खंडाळा ,कोरेगाव, तालुक्यातील हनुमान भक्तांचे नवसाला पावणारे श्रद्धास्थान , खूप वर्षांपूर्वी खेड बुद्रुक निंबोडी शिवेवर महाकाय शिळेच्या रूपात हनुमान प्रकट झाले होते मागील खूप काही वर्षांपूर्वी निंबोडी, खेड बुद्रुक पाडळी, येथील ठराविक जाणकार मंडळींनी 12 बैल जोड्या जोडून ती महाकाय शिळा सरळ करण्याचा प्रयत्न केला परंतु ती शिळा इंचभर सुद्धा जागची हलली नाही तसेच दूरवरून एक विद्वान ऋषी पाई चालत आले असता त्यांनी त्या शिळेचे दर्शन घेऊन काही जाणकार मंडळींना सांगितले की या शिळेला हलवण्याचा प्रयत्न करू नका ती जागेवरच राहू द्या तसेच या शिळेचे जो भक्तिभावाने दर्शन पूजा अर्चा करेल त्याला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही तसेच या शिळेवर बांधकाम वगैरे काही करू नका त्यामुळे आतापर्यंत चोहोबाजूंनी बांधकाम सभामंडप करण्यात आलेला आहे परंतु मूर्तीच्या वरती कसल्याही प्रकारचे बांधकाम झालेले नाही त्यामुळे या देवस्थानाला उघडा मारुती देवस्थान संबोधले जाते तसेच या देवस्थानची भक्ती भावाने जो पूजा अर्चा करेल त्याला देव भरभरून देत आलेला आहे. हे तितकेच सत्य आहे . दिवसान दिवस हनुमान भक्तांचा उत्साह पाहता या वर्षीही उघडा मारुती देवस्थान सालाबाद प्रमाणे दिनांक 02/04/2026 रोजी हनुमान जन्मोत्सव येत असून खेड बुद्रुक, निंबोडी शिवेवर असणारे उघडा मारुती जागृत देवस्थान तर्फे विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आलेले असून 01/04/2026 रोजी रात्री 09: 30 ते पहाटे 05:00 पर्यंत जानुबाई भजनी मंडळ (जवळे) यांचे सुश्राव्य एकतारी भजन तसेच 05:30 ते 07:00 पर्यंत पश्चिम महाराष्ट्रात नावाजलेले ह.भ.प. अनिकेत महाराज ठोंबरे यांचे हनुमान जन्मोत्सव आधारित सुश्राव्य कीर्तन तसेच मधल्या वेळेत षोडोपचार पूजा, रुद्राभिषेक, आरती मंत्र पुष्प, तसेच महाप्रसाद व फंड वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. तरी पंचक्रोशीतील सर्व हनुमान भक्तांनी या विविध कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही विनंती.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!