माढाचे माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील आणि जिल्हा बँकेचे संचालक भालचंद्र जगताप यांची श्री क्षेत्र वीर देवस्थानला सदिच्छा भेट.


 

वीर : महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील यांनी आज पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक भालचंद्र जगताप यांच्या समवेत श्री क्षेत्र वीर देवस्थान येथे श्रीनाथ म्हस्कोबाचे दर्शन घेतले. श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील आणि मान्यवरांचा सत्कार देवस्थान ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष संतोष धुमाळ व मा. अध्यक्ष बाळासाहेब धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप धुमाळ, ट्रस्टचे खजिनदार धुमाळ तसेच सचिव सय्यद मुलाणी, अमोल धुमाळ आणि समस्त धुमाळ परिवारासह इतर सदस्य उपस्थित होते.

ADVERTISEMENT

 

 

त्यावेळी भालचंद्र जगताप यांच्या समवेत भोर तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक सोमनाथशेठ सोमाणी, पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक तसेच अँक्वारीयस हॉटेलचे संचालक प्रतापशेठ खिरिड, प्रहार संघटना भोरचे उपाध्यक्ष अजय कांबळे आणि इतर उपस्थित होते.

 

 

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!