चैतन्य करिअर अँकँडमीत सामाजिक न्याय दिन साजरा
संपादक: दिलीप वाघमारे
शहरातील आंबेगाव न-हेगाव परिसरातील चैतन्य करिअर अँकँडमीत 26 जून राजश्री शाहू महाराज जयंती उत्सव शासन निर्णयानुसार सामजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे.
चैतन्य करिअर अँकँडमीचे संस्थापक अध्यक्ष सदाशिव खाडे सर यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.प्रथमत: संचालक अँड. संतोष खाडे यांच्या हस्ते राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून संचालक अँड. संतोष खाडे सरांनी राजर्षी शाहू महाराजांनी केलेल्या शैक्षणिक कार्याची महती विद्यार्थ्यांना सांगितली.
तद्नंतर एस.एन.नांदेडकर सरांनी शाहू महाराजांचे सामाजिक, शैक्षणिक व लोककल्याणकारी धोरणासह संपुर्ण जिवनपट विद्यार्थ्यांसमोर मांडला. यावेळी उपस्थितीत पालक प्रतिनिधी शशिकांत अहिवळे, विद्यार्थी प्रतिनिधी तुषार बरकडे, प्रथमेश निंबाळकर, प्रणव भोसले, सोहम नाईकनवरे, संकेत जगताप, मानस ओंबासे, अनिकेत मिसाळ विद्यार्थीनी प्रतिनिधी ज्ञानेश्वरी इमडे, वृषाली काकडेसह अनेक विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजर्षी शाहु राजांचा विजय असो… अशा क्रांतीकारी घोषणेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


