भोरमध्ये रक्षाबंधन अनोख्या पद्धतीने साजरा विद्यार्थ्यांनी हाताने बनवलेल्या राख्या आणि मन:पूर्वक शुभेच्छा पत्र जवानांकडे रवाना.
मंगेश पवार
दि. 22 भोर :-रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, महाडनाका भोर यांच्या वतीने एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. देशाच्या सीमांवर झुंजणाऱ्या वीर जवानांसाठी विद्यार्थ्यांकडून स्वतःच्या हाताने राख्या बनवून व शुभेच्छा पत्र लिहून त्या जवानांपर्यंत पाठविण्यात आल्या.
स्वामी सेवेकरी संतोष कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था अंतर्गत येणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज तसेच गल्स हायस्कूल, भोर येथील विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
ही राखी आणि शुभेच्छा पत्रे
विद्यालयाचे माझी विद्यार्थी साळुंगण गावचे जवान दादू दूरकर व वेनवडी गावचे जवान संतोष चव्हाण (सध्या अंबाला, हरियाणा येथे कार्यरत) यांच्याकडे पाठविण्यात आली.
उपक्रमावेळी भोर तालुका माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन समगिर व संघटनेचे सदस्य उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नवनियुक्त न्यायाधीश अमित साठे आणि नवनियुक्त गटविकास अधिकारी नेहा चिकणे यांना विशेष निमंत्रण देण्यात आले होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्यासोबत पत्रलेखनात सहभाग घेतला.
या उपक्रमासाठी जेजुरी देवस्थानचे माजी अध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा पत्रांच्या प्रती उपलब्ध करून दिल्या.
कार्यक्रमात नानासाहेब समगिर (माजी सैनिक संघटना) यांनी आपल्या अनुभवातून विद्यार्थ्यांना देशसेवेचे महत्व सांगितले व उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या शिकीळकर मॅडम, गल्स हायस्कूलच्या सौ. पाटील मॅडम, शिक्षक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक संतोष घोरपडे सर यांनी केले तर विद्यार्थिनींनी आभार प्रदर्शन करून उपस्थितांचे मनापासून आभार मानले.


