सावरदरे येथे अवकाळी पावसात शेतातील झाडावर वीज पडून 3 मेंढ्या जागीच ठार.
सारोळे:- सावरदरे(ता.भोर) येथील शेतकरी राजेंद्र भोलाजी राऊत यांच्या शेतात विद्युत प्रवाह खांबात उतरल्याने करंट लागून 3 मेंढ्या जागीच ठार झाल्या असल्याची माहिती सावरदरे गावचे सरपंच गणेश साळुंके यांनी “पुण्यभूमी न्यूजला दिली. ही घटना बुधवार 21/5/25 रोजी घडली.
गावातील शेतकरी खंडू लक्ष्मण मदने यांच्या या मेंढ्या असून परिसर व इतर ठिकाणी मेंढी चारण्यासाठी येत असतात,त्यांनी बुधवारी दिवसभर मेंढ्यांना चारून सायंकाळी अचानक आलेल्या वादळी पावसात राऊत यांच्या शेतात होत्या. दरम्यान, अवकाळी पावसात अचानक विद्युत प्रवाह खांबात उतरून करंट लागल्याने , 3 मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती सरपंच गणेश साळुंखे यांनी तलाठी परमेश्वर जाधव यांना दूरध्वनीद्वारे कळवले असता त्यांनी उत्तर दिले नाही. त्यानंतर किकवी सर्कल लहारे भाऊसाहेब आणि सारोळे कोतवाल बाबा भंडलकर यांनी घटनास्थळी भेट देऊन मृत मेंढ्यांचा पंचनामा केला. या घटनेत शेतकरी खंडू मदने यांचे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. पुढील माहिती व तपास प्रशासन करत आहे.
तलाठी परमेश्वर जाधव यांना दूरध्वनी द्वारे संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही.
मी सावरदरे गावचा सरपंच असून तलाठी आमचा फोन उचलत नाही.
गणेश साळुंखे सरपंच सावरदरे


