आयएएस अधिकारी) दीपा मुधोळ मुंडे यांनी समाज कल्याण आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला, संभाजी पुरीगोसावी यांच्याकडून स्वागत..!!


अनुजा कारखेले ( पुणे जिल्हा ) प्रतिनिधी. कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय (आयएएस अधिकारी) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीपा मुधोळ मुंडे यांनी पुण्यात समाज कल्याण आयुक्त पदाचा तात्काळ पदभार स्वीकारला आहे, बीड जिल्हाधिकारी पदावरून एक वर्षभरांपूर्वी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्या नियुक्त झाल्या होत्या. राज्य शासनाकडूंन नुकतीच त्यांची बदली पुणेतील समाज कल्याण आयुक्त पदावर करण्यात आली असून. आपल्या प्रशासकीय कामाबद्दल नेहमीच आणि शिस्तप्रिय राहणाऱ्या दीपा मुधोळ मुंडे यांनी तात्काळ समाज कल्याण आयुक्त कार्यालयात हजर राहून पदभार स्वीकारला आहे, दीपा मुधोळ मुंडे या 2011 बॅचच्या तुकडीतील (आयएएस अधिकारी ) आहेत. त्यांनी महाराष्ट्रांत विविध ठिकाणी उल्लेखनीय प्रशासकीय कामगिरी बजावली आहे, छ. संभाजीनगर,चंद्रपूर बुलढाणा,सांगली धाराशिव,बीड अशा विविध जिल्ह्यात विविध पदाची जबाबदारी पार पाडली आहे, समाज कल्याण विभागांच्या नवनियुक्त आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांची आज रोजी सातारच्या संभाजी पुरीगोसावी यांनी सदिंच्छा भेट घेवुन जयहिंद…मॅडम जी असे म्हणत त्यांचे स्वागत करीत त्यांना शुभेच्छा दिल्या, यावेळी पुरीगोसावी यांनी त्यांच्या प्रशासकीय कामाबद्दल विशेष कौतुक केले पुरीगोसावी आणि (आयएएस अधिकारी ) दीपा मुधोळ मुंडे यांचा बीड जिल्हाधिकारी असल्यापासून चांगलीच ओळख होती. संभाजी पुरीगोसावी यांनी त्यांचे स्वागत, शुभेच्छा देत रोखठोक महाराष्ट्र ग्रुपच्या परिवाराकडूंन देखील त्यांना शुभेच्छा दिल्या… यावेळी पुरी गोसावी यांनी विविध विषयावर मनमोकळा संवाद साधला, पुरीगोसावी यांच्या पत्रकारितेबद्दल आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांबद्दल जनसंपर्क तसेच प्रशासनाविषयी असणाऱ्या प्रतिक्रिया बद्दल कामाबद्दल देखील दीपा मुधोळ मुंडे यांनी विशेष कौतुक केले, स्वागताचा स्वीकार केल्याबद्दल पुरी गोसावी यांनी त्यांचे आभार मानले,


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!