अंतिम लढाई म्हणून येणाऱ्या विधानसभेकडे पहा; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांचे कार्यकर्त्यांना आव्हान


उपसंपादक:  दिलीप वाघमारे

ADVERTISEMENT

सातारा सर्किट हाऊस येथे सातारा जिल्ह्यातील विधानसभेच्या आठ ही जागा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने स्वबळावर लढण्याची तयारी संदर्भात मीटिंग चे आयोजन करण्यात आले होते त्यावेळेस रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ म्हणाले की, एकंदरच रिपब्लिकन पक्षात ची स्थापना ही गेले 32 वर्ष झालेली आहे या पक्षाच्या माध्यमातून अनेक आमदार खासदार कुणी राज्य मंत्री कुणी केंद्रीय मंत्री झाले तरी सुद्धा काही जणांनी फक्त लाभ घेणेपर्यंतच या पक्षाचा वापर केला आणि त्यानंतर त्यांनी स्वतःच्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या तयार केल्या आणि स्वतःचे आडनाव लावून पक्षाची स्थापना केली परंतु रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए म्हणजेच आंबेडकर या पक्षाचा अजेंडाचा आहे की कार्यकर्त्यांची फौज तयार करायचा व नेते घडवणारा कारखाना म्हणजेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए आहे त्यामुळे अनेक रिपब्लिकन पक्षांमध्ये लाभाचे पद मिळाले नाही म्हणून दुसर्या पक्षात जाऊन अनेक जण जिल्हाध्यक्ष झाले त्यांची सुद्धा पाठशाळा ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए आहे त्यामुळे आताचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांनी ही विधानसभेची 2024 ची निवडणूक ही अंतिम लढाई आहे असे समजून कामाला लागावे यावेळी आठही विधानसभेच्या अध्यक्ष व प्रभारी यांची निवड करण्यात आली यावेळेस झालेल्या बैठकीमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने चांगला उमेदवार मिळाला नाही तर जो विधानसभेचा अध्यक्ष असेल तो त्या विधानसभा क्षेत्रातून फॉर्म भरेल आणि त्यानंतर जो पदाधिकारी प्रभारी आहे त्या प्रभारी हा त्या संबंधित दुसऱ्या उमेदवाराला डमी अर्ज भरेल त्यामुळे एकास एक असे समीकरण ठेवून सर्व समाजातील तरुणांना यामध्ये संधी देण्यात आलेली आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारे जातिभेद न ठेवता सर्व जाती-धर्मातील बहुजन समाजातील कार्यकर्त्यांना पक्षाने न्याय दिलेला आहे त्यामुळे सर्वांनी उद्याची होऊ घातलेली विधानसभेची निवडणूक ही अंतिम लढाई आहे असे समजून कामाला लागावे तसेच विधानसभेची तयारी म्हणून प्रत्येक विधानसभेमध्ये शिव भिम संवाद यात्रेचं आयोजन केलेले आहे त्यासाठी जिल्ह्यातून एक रथ प्रत्येक तालुक्यात येईल आणि त्या माध्यमातून लोकांच्या मध्ये संवाद केला जाईल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान हेच देशाला तारू शकते अशा पद्धतीने संयोजन नियोजन करण्यात आले यावेळेस कामगारावरील जिल्हाध्यक्ष मदन खंकाळ न जिल्हा सचिव किरण बगाडे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत शिवशरण जिल्हा उपाध्यक्ष संतोष नलवडे तसेच युवक जिल्हा सरचिटणीस राज चव्हाण युवक जिल्हा सचिव आनिल उमापे त्यानंतर खटाव तालुका अध्यक्ष सागर भिलारे मान तालुका अध्यक्ष सनिदेव खरात महाबळेश्वर तालुका अध्यक्ष अमित मोरे कराड दक्षिणचे अध्यक्ष मुकुंद माने कराड उत्तरचे अध्यक्ष सर्जेराव बनसोडे कोरेगाव अध्यक्ष नितीन बोतालजी तालजी सातारा कामगार आघाडीचे अधिकारी अध्यक्ष रामभाऊ मदळे अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष शाहिद कुरेशी उपाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष कुरेशी सलीम शेख तसेच महिला आघाडीच्या स्मिता जगताप पूजा साळुंखे वंदनाताई सगरे मनीषा खरात मनीषा सोनवणे शौकत कुरेशी सलीम बागवान असलम कागदी सुनील ओव्हाळ वाहतूक आघाडीचे राजेश ओव्हाळ जिल्हा संघटक सागर फाळके कामगार आघाडीचे जिल्ह्याचे सरचिटणीस दत्ता पवार वाहतूक आघाडीचे तालुका अध्यक्ष लोंढे साहेब दादा गोतपाघर इत्यादी प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!