महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर हे वेल्हे तालुक्याच्या दौऱ्यावर.


 

वेल्हे,: निवडणुकीला आठ दिवस राहिलेल्या असताना मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर हे वेल्हे तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान तालुक्यातील विविध गावांना मांडेकर यांनी भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला. या दौऱ्यात त्यांच्या समवेत रेवनाथ दारवटकर, रणजित शिवतरे, भगवान पासलकर, किरण राऊत, निर्मला जागडे, कीर्ती देशमुख, संगिता जेधे, संदीप खुटवड, अण्णा देशमाने, राजू रेणुसे, सुनील शेंडकर, कुंदन गंगावणे हे महायुतीतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

ADVERTISEMENT

 

यावेळी बोलताना मांडेकर म्हणाले की, वेल्हे या तालूका दुर्गम असला तरी गेल्या ५० वर्षात इथं मूलभूत विकासाची काम झालेली नाहीत. रस्ते, पाणी, वीज इथले सत्ताधारी देऊ शकले नाहीत. एवढच काय तर चांगल्या दर्जाच्या शैक्षणिक संस्था त्यांना निर्माण करता आलेल्या नाहीत. त्यामुळे इथल्या मुलांना शिक्षणासाठी आपला गाव सोडावा लागतोय.

 

“रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे तालुका विकासापासून वंचित राहिला आहे विकासाला चालना देण्यासाठी रस्त्यांची सुधारणा करणे गरजेचे आहे. असे सांगताना मांडेकर म्हणाले की, मतदारांनी संधी दिल्यास पुढच्या पाच वर्षात कोणताही पक्षपात न करता मतदार संघासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून घेऊन विकास करेल हा शब्द देतो.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!