लोणंदमध्ये अमित शाह यांच्या वक्तव्याचा निषेध…. परभणी शहरातील संविधान विटंबना आणि सोमनाथ सुर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ निषेध मोर्चा
संपादक : दिलीप वाघमारे
केंद्रीय गृहमंत्री यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून तसेच परभणी शहरातील संविधान विटंबना आणि सोमनाथ सुर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ लोणंद शहरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, भारतीय बौद्ध महासभा महिला व पुरुष शाखा, समस्त खरात समाज मंडळ यांचे वतिने निषेध मोर्चा काढण्यात आला.
पंचशील बुद्ध विहारापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, शास्त्री चौक, जुनी पेठ, लक्ष्मी रोड मार्गे बुद्ध विहारापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयजयकार करीत सोमनाथ सुर्यवंशी यांना न्याय मिळावा व केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.
मोर्चाची सांगता सभेमध्ये करण्यात आली. यावेळी साक्षी गवळी, डॉ. नितीन सावंत, नंदकुमार खरात, शैलजा खरात, दत्तात्रय खरात यांची भाषणे झाली.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष निखिल खरात, कार्याध्यक्ष सुनिल खरात, भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष सञ्जन खरात, महिला शाखेच्या अध्यक्षा प्रिती खरात, समस्त खरात समाजाच्या वतिने नगराध्यक्षा सीमा वैभव खरात, बाळकृष्ण खरात यांनी लोणंद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांना निवेदन दिले.
मोर्चा यशस्वी करण्यासाठी उमेश भाऊ खरात, वैभव उर्फ बंटी खरात, संतोष मा. खरात, सौरभ खरात, पुनित खरात, सुधिर खरात, प्रफुल्ल खरात, गणेश भालेराव, अॅड. हेमंत खरात, सोनल खरात, रेशमा खरात, अर्चना चव्हाण, सुषमा खरात, स्वाती खरात, सुजाता खरात, रिना खरात शेकडो भिम अनुयायी सहभागी झाले होते.


