राष्ट्रवादी (शरद पवार पक्ष) महिलांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन.


 

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिलांवरील अत्याचारात प्रचंड वाढ होऊ लागल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसने (शरद पवार गट) पुणे शहरात जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन केले.

ADVERTISEMENT

उरण मधील यशश्री शिंदे हिची निर्गुणपणे हत्या करण्यात आली. तसेच यापूर्वी डायघर येथे एका मंदिरामध्ये अक्षदा म्हात्रे या महिलेवर तीन पुजाऱ्यांनी मिळून तिची हत्या केली होती.गुन्हेगारांना पोलिसांची भीतीच राहिली नसल्याने असे प्रकार घडत असल्याचा आरोप करीत महिला जिल्हाध्यक्ष भारती शेवाळे तथा युवती जिल्हाध्यक्ष दुर्गा चोरघे यांच्या मार्गदर्शनानुसार विद्या यादव, शुभांगी जायकर, रुक्मिणी पवार व इतर सर्व इंदापूर, बारामती,जुन्नर,खेड,भोर,राजगड, मुळशी, महिला अध्यक्ष पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना निवेदन दिले. यावेळी महिलांनी राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणा देऊन खटला फास्ट ट्रॅकवर चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. यावेळी महिलांनी “सुरक्षा द्या सुरक्षा द्या महिलांना सुरक्षा द्या ” अशा प्रकारच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!