उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल गुन्हे शाखा पोलीस मनोज जाधव यांना “प्रशंसापत्र ” देऊन गौरविण्यात आले! पोलीस अधीक्षक समीर शेख.
संभाजी पुरी गोसावी
सातारा तालुका पोलीस ठाणे गुरनं. ४६०/२०२३ भा.दं.वि. कलम ३९५ या गुन्हयातील वयोवृद्ध फिर्यादी महिला व तिचे पती यांना अज्ञात आरोपींनी लाकडी दांडक्याने गंभीर मारहाण करुन त्यांचे जवळील १,००,२००/- रूपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याबाबत गुन्हा नोंद होता.
स्थानिक गुन्हे शास्त्रा सातारा यांचे पथकाने सदर गुन्हयाचे अनुषंगाने गोपनिय माहिती काढून आरोपीस त्याचा साथीदार विधी संघर्षग्रस्त बालक यांना खांमगांव ता. फलटण जि.सातारा येथून दि.०५/०७/२०२४ रोजी ताब्यात घेवुन त्यांचेकडे कौशल्यपुर्ण तपास करून अथक परिश्रम घेवुन कसोशिने गुन्हवाची उकल करून सदरचा गुन्हा त्यांनी केला असल्याचे उघड केले तसेच सदर आरोपींनी सातारा जिल्हयामध्ये दरोडा, जबरी चोरी, घरफोडी व चोरी यांसारखे एकुण २६ गुन्हे केल्याचे निष्पन्न करून त्यांचेकडुन २६ गुन्हवातील चोरीस गेलेल्या मालापैकी ५४.३ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चालु बाजारभावाप्रमाणे ३९.०९,६००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल व गुन्हयात वापरेले वाहन एक हिरो होंडा स्प्लेंडर मोटार सायकल हस्तगत करून उत्कृष्ठ कामगिरी केली आहे.
त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखा सातारा यामधील मनोज हिंदुराव जाधव पोलीस हवालदार यांना प्रशंसनीय कामगिरीबद्दल केल्याबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक श्री सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख, यांनी अभिनंदन केले आहे. मनोज जाधव यांनी केलेल्या कामगिरीचा सातारा जिल्हा पोलीस दलास अभिमान वाटतो. तसेच या पुढेही आपल्याकडून अशाच उत्कृष्ठ कामगिरीची अपेक्षा सातारा पोलीस दल करीत आहे.