उत्रोली येथे पंचायत समिती भोर यांच्याकडून कायदेविषयक कार्यशाळा आयोजित.
दि. २९ भोर : महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या संवेदनशील गुन्हे घडत आहेत. काही दिवसांपूर्वी बदलापूर येथे शाळेमध्ये लहान मुलीवर अत्याचार झाला होता. त्या अनुषंगाने उत्रोली ता.भोर येथे जिल्हा परिषद येथील मुख्याध्यापक आणी केंद्र प्रमुख यांना कायद्याची माहिती देण्यासाठी तालुका स्तरीय शिक्षण परिषद आणी कायदेविषयक कार्यशाळा गुरुवार दि. २९ ऑगस्ट रोजी आयोजित केली होते.
सदर कार्यशाळेत लहान मुलांचे लैंगिक अत्याचार अधिनियम 2012 कौटुंबिक हिंसाचार अधिनियम 2005 आणी कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक शोषण अधिनियम 2013 या कायद्यावर वर माहिती देण्यात आली.
उपस्थित मान्यवर मा. गटविकास अधिकारी धनावडे,गटशिक्षणाधिकारी बामणे,विस्तार अधिकार शिक्षण
कायदे विषयक मार्गदर्शन श्रीम. एम. जी.जाधव मॅडम संरक्षण अधिकारी भोर आणी श्री. एन. बी मोरे संरक्षण अधिकारी वेल्हे यांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीम मोनिका रंधवे यांचेमार्गदर्शन खाली केले
सदर कार्यशाळेत मा जिल्हा महिला बालविकास अधिकारी पुणे कार्यालयकडून प्रसिद्ध झालेली कायदेविषयक पुस्तिकाचे वाटप करण्यात आले.सदर ची कार्यशाळा ही पंचायत समिती भोर यांचेकडून आयोजित करण्यात आली होती. यामध्ये गट विकास अधिकाऱ्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.