अज्ञात वाहनाच्या धडकेत मोरवाडी येथील युवकाचा मृत्यू.
सारोळे : भरधाव वेगात जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने युवकाला धडक दिली. त्यामध्ये युवकाचा मृत्यू झाला. याबाबत राजगड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे सातारा महामार्गावर किकवी ता. भोर जि. पुणे गावच्या हद्दीत सूर्या हॉटेलच्या समोर सातारा पुणे हायवे रोडवर शशिकांत ज्ञानोबा मोरे वय 36 वर्ष रा. मोरवाडी ता.भोर जि पुणे हे पायी रस्ता क्रॉस करीत असताना अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील वाहनाने धडक दिली असून अपघाताची खबर न देता निघून गेला असून त्याच्या मृत्यूस कारणीभूत झाला आहे. यामुळेे त्यांंच्या वडिलांनी राजगड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. याचा अधिक तपास राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पो स इ पाटील करीत आहे.

 
			

 
					 
							 
							