पहिलीसाठी सहा वर्षांची अट; 31 डिसेंबर 2024 पर्यंत 6 वर्ष असणाऱ्यांना प्रवेश!
31 डिसेंबर 2024 रोजी सहा वर्षे पूर्ण होणारी बालके यंदा इयत्ता पहिलीत दाखल करता येतील. सहा वर्षे पूर्ण असणाऱ्या अशा बालकांना सक्ती पात्र तथा दाखल पात्र म्हणून समजण्यात येईल. ‘आरटीई’नुसार अशा बालकांना शाळेत दाखल करून घेण्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांवर असणार आहे.
विद्यार्थ्यांवर कमी वयात अभ्यासाचा अधिक ताण पडू नये, यासाठी केंद्र सरकारने २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पहिलीतील प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे वय सहा वर्षे कधीपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहेत हे निश्चित केले आहे. त्यामुळे आता खासगी असो की शासकीय शाळांना सहा वर्षे पूर्ण नाहीत, त्या विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही.
अभ्यासक्रमनिर्मितीची गरज
कमी वयात पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरीत संधी लवकर मिळते तर काहींना नोकरीची संधी इतरांच्या तुलनेत जास्त मिळते, अशीही उदाहरणे पाहायला मिळतात.
बाळाचा जन्म झाल्यापासून २१ दिवसांत माहिती संबंधित कार्यालयात द्यावी लागते. २१ दिवसांपेक्षा अधिक दिवस होऊनही बाळाच्या जन्माची नोंद न झाल्यास आता तहसीलदारांच्या माध्यमातून जन्मदाखला मिळतो.
जन्मतारीख – वयोमर्यादा
नर्सरी -१ जुलै २०२० ते ३१ डिसेंबर २०२१ – ३ वर्षे
ज्युनिअर केजी -१ जुलै २०१९ ते ३१ डिसेंबर २०२० – ४ वर्षे
सिनिअर केजी -१ जुलै २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९ -५ वर्षे
इयत्ता पहिली -१ जुलै २०१७ ते ३१ डिसेंबर २०१८ – ६ वर्षे

 
			

 
					 
							 
							