वाई ! शेतीच्या रस्त्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी तर परस्पर विरोधी विनयभंग गुन्हे दाखल .
वाई प्रतिनिधी :आशिष चव्हाण
वाई तालुक्यातील एका गावात शेतात जाणाऱ्या रस्त्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारीची घटना दि.8 एप्रिल रोजी रात्री 9.30 वाजता घडली.दोन्ही बाजूकडून एकमेकांच्या विरोधात विनयभंग, मारहाणीचे गुन्हे वाई पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही गटातील एकालाही वाई पोलीसांनी अटक केली नाही.
ADVERTISEMENT
याबाबत मिळालेली माहिती अशी की वाई तालुक्यातील एका गावातील 28 वर्षीय महिलेने वाई पोलीस ठाण्यात शेतात जाण्यायेण्याच्या कारणावरून मारहाण, विनयभंग केल्याचा गुन्हा 11 जणांवर दाखल केला आहे. तर दुसऱ्या 22 वर्षीय महिलेने 7 जणांच्या विरुध्द गाडी अडवून तिला व तिच्या भावाला मारहाण करून विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गटातील अद्याप कोणाला ही वाई पोलिसांनी अटक केली नव्हती.


