गणरायांचे आगमन अन् कुडाळमध्ये ध्वनिक्षेपक मालकांना मेढा पोलीसांचा दणका, मेढा पोलिसांची कारवाई,
संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा ) प्रतिनिधी.
मेढा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गणेश आगमन सोहळ्यावेळी ध्वनिक्षेपकांस मनाई असतानाही कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी कुडाळ (ता. जावळी) मेढा पोलीस ठाण्यात मेढा मालकांवर कारवाई करण्यात आली आहे, याप्रकरणी अभिषेक रवींद्र चव्हाण (रा. म्हसवे ता. जावली) शुभम शहाजी बाकले (रा. जुळेवाडी ता. कराड) कृष्णा पोपट मोरे (रा. गोडोली ता.जि. सातारा) या ध्वनिक्षेपकांच्या मालकांवर मेढा पोलिसांनी कारवाई केली आहे, याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून सार्वजनिक ठिकाणी मोठ्या कर्कश आवाजात ध्वनिक्षेपक लावण्यास बंदी असतानाही ए.पी. आउटलाइन साऊंड सिस्टिम पावरप्लस साऊंड सिस्टिम व एस.आर. एस साऊंड सिस्टीम या ध्वनिक्षेपकांच्या मालकांनी कुडाळ येथे नवज्योत मित्र मंडळ संत सावता माळी मंडळ व पिंपळेश्वर मित्र मंडळाच्या ठिकाणी मोठ्या कर्कशा आवाजात ध्वनिक्षेपक लावला असल्याची माहिती मेढा पोलिसांना मिळाली होती, मेढा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत मेढा पोलीस ठाण्याचे स.पो.नि. पृथ्वीराज ताटे यांनी ही कारवाई केली आहे,*