पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूजच्या दणक्याने भारतीय स्टेट बँकेच्या फलटण शाखेकडून ठेवीदाराला अखेर तात्काळ पैसे मिळाले


[

 

उपसंपादक : दिलीप वाघमारे

ADVERTISEMENT

लोणंद येथील लाभार्थीचे वाठार स्टेशन येथील शिवकृपा पतपेढी च्या एका व्यापाराला अनेक वर्षापूर्वी जामीन झाले होते बँकेची थकबाकी वाढत गेल्याने जामीनदाराची ठेव गोठवली होती आणि जामीनदाराची बायको दीर्घकाळ आजारी असल्याने त्याला पैशाची अडचण भासली होती बँक व पतपेढी यांचे ताळमेळ जुळत नसल्याने त्याप्रकरणी त्यांचे फलटण येथील भारतीय स्टेट बँक मधील ठेव पावती चे पैसे लॉक केले होते त्यासाठी उपसंपादक दिलीप वाघमारे यांनी मध्यस्थी करून बँक मॅनेजरला विनवणी केली आणि अखेर तडजोड झाल्याने सर्व कागदपत्रक सोमवारी फलटण येथे स्टेट बँकेला सुपूर्त केले परंतु तारखेचा घोळ झाल्याने मॅनेजर स्टेट बँकेचे टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनाला आल्याने पुण्यनगरी महाराष्ट्र या न्यूजने बातमी प्रसिद्ध करताच बँकेच्या कर्मचारी खडबडून जागे झाले आणि चौकशी सुरू झाली आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांनी तडजोडीची भूमिका घेत अखेर ठेवीदाराचे पैसे विना अट 24 जुलै रोजी परत केले अशा अनेक गावात जामीनदारांना वेठीस धरले जाते यापुढील काळामध्ये सातारा जिल्ह्यातील कोणत्याही कुटुंबावर अन्याय झाल्यास दैनिक पुण्य भूमी महाराष्ट्र सर्वांच्या पाठीशी राहून न्याय मिळवून दिला जाईल त्यामुळे सर्वत्र पुण्यभूमी महाराष्ट्र यांचे अभिनंदन होत आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!