मुद्देमाल आणि मोबाईल फोन रिकवर मध्ये तसेच वार्षिक तपासणी दरम्यान वाई पोलीस ठाणे जिल्ह्यात प्रथम:- पोलीस अधीक्षक समीर शेख,
उपसंपादक :संभाजी पुरीगोसावी
वाई पोलिस ठाणेचा पदभार घेतल्यापासून प्रभारी अधिकारी परि. पोलीस उपअधीक्षक श्याम पानेगांवकर पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील, वाई पोलीस ठाणेच्या हद्दीमधील तपास करून हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल आणि मोबाईल फोन रिकवर मध्ये तसेच वार्षिक तपासणी दरम्यान वाई पोलीस ठाणे हे जिल्ह्यात प्रथम असे उदागार करीत माननीय पोलीस अधीक्षकांकडून वाई पोलीस ठाणेच्या प्रभारी अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र देवुन गौरविण्यात आले, यावेळी माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर मॅडम यांच्या उपस्थितीत वाई पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी परि.पोलीस उपअधीक्षक श्याम पानेगांवकर,पोलिस अंमलदारांचे अभिनंदन करण्यात आले.