ग्रामपंचायत वाघजवाडीच्या प्रयत्नांना यश.


भोर प्रतिनिधी : सागर खुडे

वागजवाडी येथे विविध विकास कामांसाठी स्थानिक विकास निधीतून आदर्श पुणे जिल्हा परिषद सदस्य तथा विघ्नहर्ता नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष,भोर तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत बाठे यांच्या माध्यमातून या वर्षी सिद्धेश्वरनगर येथील महादेव मंदीर परिसर सुशोभीकरण,तसेच भव्य सभामंडप यासाठी ग्रामपंचायत सरपंच निकिता आवाळे, समीर आवाळे आणि सदस्य कमिटी यांच्या सततच्या मागणीमुळे तसेच होणाऱ्या पाठपुराव्यामुळे तब्बल ७लक्ष एवढा भरगोस निधी मंजूर करण्यात आला आहे.

 

यापूर्वीही चंद्रकांत बाठे यांनी आपल्या कार्यातून तालुक्यात एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.

 

ADVERTISEMENT

खरतर हे काम श्रेयवादाच्या चक्रव्यूहात बरीच वर्षे रखडले होते.ह्या कामाच अप्रत्यक्षरीत्या श्रेय लाटण्याचा अनेकांचा प्रयत्न असल्याचा प्रकार निदर्शनास येत आहे.परंतू चंद्रकांत बाठे यांच्या माध्यमातुन ग्रामपंचायतीतर्फे केलेल्या मागणी पत्राद्वारे डी.पी.सी अर्थात जिल्हा नियोजन समितीला केलेल्या मागणीमुळे खरतर हा निधी उपलब्ध झाल्याचे समजते आहे.या छोट्याशा गावात सर्व राजकीय नेत्यांचे विशेष लक्ष असले तरी देखील बाठे यांची पूर्वीपासूनच गावाशी असलेल्या चांगल्या हितसंबंधामुळे हव्या त्यावेळी विविध विकास कामांसाठी भरघोस निधी मंजूर करून दिल्याचे सर्वश्रुत आहे.

 

 

काल रोजी चंद्रकांत बाठे यांनी मंदिराला दिलेल्या भेटी दरम्यान त्यांनी केलेत्या सहकार्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करून त्यांना शाल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देत त्यांचें यावेळी आभार व्यक्त केले.सदर प्रसंगी माजी आजि सरपंच,उपसरपंच, उद्योग आघाडी तालुका पदाधिकारी आणि ग्रामपंचायत वागजवाडी-राउतवाडी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!