महाराष्ट्राचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री मा.ना. शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून डेरवण गावाला भूकंपग्रस्त निधीमधून विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभामंडपाला 12 लाख रुपये निधी मंजूर
पाटण प्रतिनिधी: शंकर माने :17 मार्च :पाटण तालुक्यातील डेरवण गाव स्वातंत्र्य सैनिकांचे म्हणून ओळखले जाते बरेच वर्षापासून लोकांची मागणी होती की विठ्ठल रुक्मिणी मंदिर व्हावे . माननीय मंत्री महोदय शंभूराजे देसाई साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभामंडपाचा भूमिपूजन कार्यक्रम सोहळा आज संपन्न झाला. या कार्यक्रमाला चाफळ विभाग कोर कमिटी तसेच संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष भरत साळुंखे .डेरवण गावचे लोकनियुक्त सरपंच मंगल बाखले .
उपसरपंच उषाताई मोंडे, तंटामुक्ती अध्यक्ष आनंदराव महिपाल, शिवशंभो दूध संघ पाटण संचालक संदीप यादव, माजी सरपंच अभय यादव, सामाजिक कार्यकर्ते आनंदराव बाकले, मच्छिंद्र यादव, संजय पाटोळे, ग्रामपंचायत सदस्य संजय पवार, निलेश सोनवणे, रूपाली यादव, तेजस्विनी गुरव, गावातील सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य कार्यकर्ते पदाधिकारी इतर क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते .