राज्यातील शिक्षकांना ड्रेस कोड लागू.


प्रतिनिधी :  राज्यांमधील सर्व शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठी राज्य सरकारने नवीन नियमअटी लागू करून नाविन्यपुर्ण संकल्पनेतून ड्रेस कोड लागू केला आहे. त्यामुळे आता शिक्षकांना शाळेमध्ये जीन्स व टी-शर्ट घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

दि.15 मार्च रोजी काढलेल्या परिपत्रक द्वारे घेतला आहे.

राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक हे देशाची भावी पिढी युवा उद्योजक, सरकारी अधिकारी, डॉक्टर, पोलीस,इंजिनीयर, वकील आणि सरकारी अधिकारी घडवतात. तसेच जन माणसात शिक्षक वर्गाला गुरु म्हणून पाहिले जाते. शिक्षक वर्गाचा संवाद हा विद्यार्थी पालकांबरोबर गावातील लोकप्रतिनिधींशी होत असल्याकारणाने त्यांची वेशभूषा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणून पाहिला जातो. वेशभूषा वरून ते कार्यरत असलेल्या पदाची एक वेगळी ओळख निर्माण होते.सहसा विद्यार्थी अनुकरणप्रिय असतात. शिक्षकांची वेशभूषा अव्यवस्थेत व अस्वच्छ असेल तर त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवरती होतो.

ADVERTISEMENT

तसेच वेशभूषा स्वच्छ असेल तर विद्यार्थी आणि शिक्षकांनाही आनंदाचे वातावरण तयार होते.

 

शिक्षकांचा परिधान करण्याचा ड्रेस कोड कसा असेल.

 

पुरुष शिक्षकांना फिकट रंगाचा शर्ट आणि गडद रंगाची पॅन्ट.

महिला शिक्षकांना साडी, चुडीदार किंवा कुर्ता असे ड्रेस कोड निश्चित करण्यात आले असे राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घोषणा केली आहे.

तसेच यासोबत दुसरी महत्त्वाची घोषणा, जसे डॉक्टर समुदाय आपल्या नावापुढे अभिमानाने ” DR “अक्षर लावतात तसेच शिक्षकांना आता इंग्रजी भाषेमध्ये “DR” तर मराठी भाषेत “टी ” असे संबोधन लावण्यात यावे.

त्याचप्रमाणे शिक्षकांच्या वाहनांवर स्टिकरदेखील लावण्यात येणार आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!