उद्या 12 वी चा निकाल; मार्कशीट डाऊनलोड करण्यासाठी ‘या’ गोष्टी आवश्यक.
प्रतिनिधी : शंकर माने
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक (12th Board Exam Results 2024) शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 12 वी परीक्षेचा निकाल दि. 21 मे (मंगळवार) रोजी जाहीर होणार आहे. मंगळवारी दुपारी १ वाजता हा निकाल जाहीर केला जाईल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 या कालावधीत 12 वी बोर्डाच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षांचा निकाल विद्यार्थी शिक्षण मंडळाच्या https://mahresult.nic.in/ अधिकृत वेबसाइट किंवा अन्य वेबसाइटवरून पाहू शकता. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना काही महत्त्वाचे तपशील विचारले जातात, जे भरल्यानंतर निकाल पाहता येईल. या तपशीलाविषयी आणि निकाल कसा पहायचा याबद्दल सविस्तर जाणून घेवूया…
कुठे पाहता येईल निकाल
1. MSBSHSE ने आपल्या अधिकृत नोटीसमध्ये काही वेबसाइट्सचा उल्लेख केला आहे, ज्यावर HSC 2024 चा निकाल पाहता येईल. विद्यार्थी या वेबसाइट्सना भेट देऊ शकतात आणि सर्व माहिती भरून त्यांचा निकाल पाहू शकतात.
2. विद्यार्थी एसएमएस सेवेचाही वापर करून निकाल पाहू शकतील.
3. इयत्ता १२ वीचा निकाल डिजिलॉकरवरदेखील उपलब्ध असेल, जो विद्यार्थी ॲपमध्ये लॉग इन करून डाउनलोड करू शकतात.


