भोर तालुक्याला अवकाळीचा बसला फटका
भोर प्रतिनिधी : सागर खुडे
शनिवारी रात्री व रविवारी दुपारी काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाने तडाखा दिला, नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक फटका बसला असून, निफाड तालुक्यात गारपिटीने द्राक्षबागांसह ऊस, कांदा पिकांचे नुकसान झाले आहे. सातारा शहर, पुणे शहर आणि मुंबई परिसरात दोन तास मुसळधार पाऊस झाला.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भातील काही जिल्ह्यात सोमवारपासून पावसाची तीव्रता वाढणार असून गारपिटीचीही शक्यता वर्तवली होती.


मार्च ते मे महिन्यात उकाडा वाढल्यामुळे लोक खूप गर्मीमुळे त्रस्त झालेलं आणि त्यातच १५में ते १९मे दरम्यान तुरळक किंवा काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविली असताना आज रोजी आज रोजी (२०में)झालेल्या अवकाळीच्या पावसाने विजांच्या कडकडाटासह पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यासह आसपासच्या परिसरातील गावांना चांगलच झोडपून काढले आहे. आणि त्याचा फटका जनसामान्यांच्या सर्वांगीण जीवन मानावर पडलेला दिसतो.
भोर तालुक्यासह पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या अतीदाब वेगवान वाऱ्याच्या झोताने ठिकठिकाणी घराची पडझड झाली, त्यातच साधारण दीड ते अडीच मिलिमीटर गारपीट सुरू असलेने बागायत शेतीतील पिकांची देखील फार मोठया प्रमाणात नुकसान झाले.
जास्त प्रमाणात किकवी पंचक्रोशीत पाऊस झाला असलेने
आज रोजी (२०में)अवकाळीच्या अति वेगवान सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसाने भोरं तालुक्यातील किकवी पंचक्रोशीतील गावांसह तालुक्यातील घराची पडझड, पडझडीत सागवणाची तसेच अन्य झाडे रस्त्यात कोसळली आहेत., घरांवरील पत्रे उडले असून गणपत मोरे,मोरवाडी यांचे घराची पडझड, वागजवाडी येथील साळवे,मंगल मोरे यांचे घरची पडझड, वागजवाडी उपसरपंच समीर आवाले याचे पोट्री शेडची भिंत देखील कोसळली आहे, तसेच नजीकच्या भागात असनारे वनविभागाचे कार्यालयावरिल पत्रे,हॉटेल एफोटेल बाय सयाजी येथे हॉर्डींग कोसळल आहे.सद्यस्थितीत ग्रामपंचायत किकवी सरपंच, उपसरपंच, वागजवडी सरपंच उपसरपंच यांनी आपले स्तरावर रस्त्यावरील पडलेली झाडें जेसीबीचें साहाय्याने बाजूला करून रस्ता खुला केला. तसेच सातारा ते पुणे महामार्गावर किकवी गावचे हद्दीत रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. त्यामुळे अपघाताची शक्यता होती, सेवा रस्त्यांवरती झाड पडल्यामुळे रस्ता बंद झाला होता. त्यावेळी किकवी गावचे सरपंच नवनाथ कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जेसीबीच्या साह्याने झाड बाजूला काढून सेवा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. त्यामुळं एकंदरीत परिस्थीती पाहता, परिसरातील सर्वांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
सुदैवाने,
जीवितहानी टळली परंतु बऱ्याच गावांतील विजेचे पोल पडून तारा तुटल्यामुळे अनेक गावे अंधारात गेली आहेत. त्यामुळं वीज महावितरण प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर परिस्थितीची पाहणी करावी अशीही मागणी होत आहे.
त्या त्या भागांतील ग्रामपंचायत तसेच इतरत्र प्रशासकीय यंत्रणेकडून गटविकास अधिकाऱ्यांच्या मदतीने पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळवुन देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची अशी या भागांतील गावकऱ्यांकडून आर्त हाक देण्यात आली.


