वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण:- अखेर निलेश चव्हाण यांच्या नेपाळ बॉर्डरवरून पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या..!! निलेश चव्हाण पोलिसांना देत होता गुंगारा,
संभाजी पुरीगोसावी ( पुणे जिल्हा ) प्रतिनिधी. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अखेर निलेश चव्हाणला अटक करण्यात आले आहे, बावधन पोलिसांनी कारवाई केली आहे, पोलिसांनी त्याला नेपाळच्या बॉर्डरवरून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. निलेश चव्हाण हा दिल्ली राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेशामधून नेपाळला पोहचला होता, निलेश चव्हाण हा वैष्णवीच्या नणंद करिष्मा हगवणे हिचा तो मित्र होता, त्याने वैष्णवीच्या बाळाला कस्पटे कुटुंबीयांना देण्यास नकार दिला होता, तसेच त्यांना बंदुकीचा धाक दाखवत हाकलून लावत होता, मात्र कस्पटे यांच्या घरी ते बाळ नव्हते एका अज्ञात व्यक्तीने ते कस्पटे कुटुंबांना दिले होते, हे बाळ निलेश कडे कसे? आणि त्याचा या प्रकरणाशी काही संबंध हे तपासण्यासाठी पोलीस निलेश च्या शोधात होते, गेल्या काही दिवसांपासून तो फरार होता, मात्र त्याला आता बावधन पोलिसांनी अटक केली आहे,10 दिवसानंतर निलेश चव्हाण ला बेड्या ठोकल्या आहेत, निलेश चव्हाण पुण्यातून दिल्लीला कारने गेला होता दिल्लीतून दुसऱ्या कारने उत्तर प्रदेशातील गोरखपुरला गेला होता, अन् तिथून तो नेपाळमधील भैरवा जिल्ह्यातील एका गावात दबा धरून बसला होता, वैष्णवीच्या मृत्यूनंतर बाळ काही दिवस निलेश कडे होते बाळ ताब्यात देण्यासाठी गेलेल्या कस्पटे कुटुंबियांना निलेशने बंदुकीचा धाक दाखवल्याचाही आरोप त्याच्यावर आहे,

