संध्या मोरेने भात लागणीसाठी चालवला रोटर
मेढा प्रतिनिधी :- बजरंग चौधरी
‘शेतकरी नवरा नको गं बाई म्हणणाऱ्या मुलींना पाटणच्या संध्या मोरे हिने दिली चपराक .पाटण तालुक्यातील दुर्गम भागात सद्या भात लागणीची कामे सुरू आहेत सातारा जिल्हयातील बऱ्याच ठिकाणी शेतीच्या कामासाठी बैलजोडी चे प्रमाण अल्प असलेने शेतीची बरीच कामे आधुनिक तंत्रज्ञानान होत आहेत पाटण तालुक्यातील मोरेवाडी येथील संध्या लक्ष्मण मोरे या कन्येने रोटरच्या सहाय्याने केलेल्या मशागतीचे पाटण ,मोरणा विभागात कौतुक होत आहे मोरेवाडी येथील सचिव लखन मोरे यांची कन्या संध्या हिने खंडाळा येथे शेती शास्त्राची पदवी घेतली आहे. राहुरी विद्यापीठात देखील शेतीविषयक अभ्यास केला आहे. घरी स्वतः ची शेती असून शेती करण्याची आवड असल्यामुळे शेतात भात लागणीच्या कामात ती घरच्या लोकांना मदत करते संध्या ने स्वतः रोटर चालवून आजच्या तरुण पिढीला शिक्षणाबरोबर शेतीचा आदर्श घालून दिला आहे.आजच्या तरुण मुली शेतकरी मुलगा म्हटलं की नको गं बाई असं म्हणतात .
सद्या भात लागणी जोमात सुरू आहे. त्यातच आता पारंपरिक बैलजोडीच्या औताची जागा रोटरने घेतली आहे. त्यामुळे शेतकरी शेतात सर्रास रोटरचा वापर करत आहेत. शेतीक्षेत्रात आज अनेक बदल होत असताना शेतीक्षेत्र हे आजच्या युवकांना प्रेरणादायी आहे, हे एका युवतीने दाखवून दिले आहे या तिच्या कामाचे संपूर्ण जिल्हयात कौतुक होत आहे


