इंदू मिल येथील बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकास उदासीन व एससी एसटी उपवर्गीकरणाची समिती गठीत करणाऱ्या जातीवादी महायुती सरकारच्या विरोधात रिपाई उमेदवार देणार..
उपसंपादक: दिलीप वाघमारे
महा युतीबरोबरच महाविकास आघाडी ही जातीवादी व दलित विरोधी आहे नाही तुझ्या सरकारमध्ये दलितांच्या विरोधात अनेक निकाल करण्यात आले त्यामध्ये हिंदू मिल येथे होत असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या बाबत उदासिनता तसेच पुतळ्याची उंची कमी करणे इत्यादी कामे महायुती सरकारने केलेली आहेत तसेच पंधराशे कोटी रुपये अखर्चित ठेवले आहेत तसेच 15 ऑक्टोंबर रोजी शेवटचा कॅबिनेटमध्ये एससी एसटीच्या उपवर्गीकरणासाठी समिती गठित करण्यात आली व त्यास निवृत्त न्यायालय चे न्यायाधीश अध्यक्ष तर बार्टीचे महासंचालक यांना सचिव करण्यात आले आहे अशा पद्धतीचे जातीय द्वेष असण्याची भावना संबंधित सरकारने दिली आहे त्यामुळेच अशा जातीवाद्यांना रोखण्याकरता रिपाई ताकतीने महाराष्ट्रात निवडणूक लढणार वाई महाबळेश्वर खंडाळा विधानसभेमधून अमित मोरे संतोष जाधव पवन धायगुडे कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून मनीषा सोनवणे नितीन बोतालजी सातारा विधानसभा दामिनी निंबाळकर रामभाऊ मदाडे किरण बगाडे पाटण विधानसभा विकास कांबळे राज चव्हाण कराड उत्तर महेंद्र गोतपागर सर्जेराव बनसोडे कराड दक्षिण मुकुंद माने संतोष भिसे तर मान खटाव मधून सनी देवघरात अनिल उमापे व फलटण मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांनी पक्षाकडे उमेदवार मागणी अर्ज केलेले आहेत याबाबत जिल्हा अध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र निवडणूक निरीक्षक दादासाहेब ओव्हाळ म्हणाले की जिल्हा तीन उमेदवारांच्या मागणीचा विचार करून लवकरच पक्षश्रेष्ठी व महाराष्ट्र समिती समोर या नावांची घोषणा केली जाईल आणि यामधून आठ ही विधानसभेमध्ये उमेदवार देण्याचे जाहीर केले जाईल यावेळेस कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष मदनकांकाळ वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष राजेश ओव्हाळ युवक आघाडीचे सोमनाथ धोत्रे मुस्लिम आघाडीचे शाहिद कुरेशी इत्यादी प्रमुख कार्यकर्त्यांसह जिल्हा सरचिटणीस संतोष जाधव जिल्हा सचिव किरण बागडे तसेच सर्व तालुका अध्यक्ष उपस्थित होते व तसेच मोठ्या संख्येने युवक व महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती होती


