चैतन्य अँकँडमीत अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
पुणे / प्रतिनिधी एस. एन. नांदेडकर
शहरातील न-हे आंबेगाव येथील सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र चैतन्य करिअर अँकँडमीत
लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त संस्थापक अध्यक्ष सदाशिव खाडे सर, संचालक अँड.संतोष खाडे सर यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
ADVERTISEMENT
प्रथमत: प्रतिमेस पुष्पहार अर्पण आला. तद्नंतर पोलीस भरती मार्गदर्शक एस.एन.नांदेडकर सरांनी साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळकांचा समग्र इतिहास सांगितला.
यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी तुषार बरकडे, उत्कर्ष खरात, मानस ओंबासे, संघर्ष खरात विद्यार्थीनी प्रतिनिधी वृषाली काकडे, कोमल ढवळेसह अनेक विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


