आयएएस अधिकारी ) आशिमा मित्तल यांनी जालना जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला, जिल्ह्यात नेहमीच प्रयत्नशील राहणार …!!


कलावती गवळी (जालना जिल्हा) प्रतिनिधी. राज्य शासनांने बुधवारी सायंकाळी आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असुन. यामध्ये जालना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचाही समावेश होता. त्यांची बदली ठाणे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे. तर त्यांच्या रिक्त जागेवर नाशिक येथील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या आशिमा मित्तल यांची जालना जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आशिमा मित्तल यांनी आज दुपारी जालना जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे, यापूर्वी त्यांनी नाशिक येथे सीईओ म्हणून काम करताना विविध उपक्रम राबविले असून शिक्षण विभागातही त्यांचे उपक्रम राज्यभर चांगलेच चर्चेत होते. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागाचे कामकाज सुधारण्यासाठी मित्तल यांची भूमिका महत्त्वाची ठरली. त्यांच्या कार्यकाळात सुपर 50 यासारख्या उपक्रमांनी राज्यभर ओळख निर्माण झाली होती. नाशिक जिल्ह्यात दोन वर्ष दहा महिने प्रशासक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. जालना जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी 2023 मध्ये जालना जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता. डॉ. श्रीकृष्ण पांचाळ हे जालना जिल्ह्यात नेहमीच प्रयत्नशील राहिले, सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने बुधवारी डॉ. पांचाळ यांची ठाणे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली असून त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी पदाचा पदभार तात्काळ स्वीकारला आहे. तर जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी शुक्रवारी दुपारी जालना जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे, यावेळी पदभार स्वीकारताच जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी कार्यालयात सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. त्यांच्या नियुक्तीमुळे जालन्याला महिला जिल्हाधिकारी मिळाल्या आहेत. सर्वसामान्यांना प्रथम न्याय देणाऱ्या जिल्हाधिकारी कर्तव्यदक्ष,शिस्तप्रिय (आयएएस अधिकारी ) म्हणून त्यांना ओळखले जाते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!