नसरापुर मधील मुख्य रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत शिवसाम्राज्य प्रतिष्ठानतर्फे बांधकाम विभाग राजगड (वेल्हे)यांना रास्ता रोको आंदोलनाचा इशारा…
मुख्य संपादक: मंगेश पवार
कार्यकारी संपादक:सागर खुडे
पुणे सातारा महामार्ग लगतील भोर तालुक्यातील नसरापूर हे गाव राजगड तालुक्याच्या मुख्य मार्गाला जोडले गेलेले आहे. नसरापूर ते राजगड भागामध्ये बरीच पुरातन देवस्थान,आणि मंदिरे आहेत. त्यामध्ये विशेषतःबनेश्वर येथील महादेव मंदिर, वेल्हे गावातील आई मेंगाई देवीचे मंदिर,वांगणीची आई मळाई देवी, कुरुंगवडीची आई कुरुंजाई माता यांसह ऐतिहासिक राजगड, तोरणा हे ऐतिहासिक गडकोट किल्ले आहेत. लोक गडकोट किल्ल्यांवर पर्यटनासाठी जाण्यासाठी या मार्गाचा वापर करतात.पण आता या मार्गाची पूर्णपणे दूरावस्था होऊन चाळण झालेली आहे.जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. यामुळे पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची नेहमीच गैरसोय होतें,आणि अभावी प्रवास वेळेत पूर्ण न होता रखडावे लागत आहे.कित्येक दिवस नागरिकांनी बांधकाम विभाग प्रशासनावर प्रश्न उपस्थित केला आहे.नसरापूर राजगड(वेल्हे)तालुक्यातील गावातील लोकांनी अजून किती दिवस या खड्ड्यातून जायचे या खड्ड्यांमुळे गाड्यांचे खूप प्रमाणात नुकसान झालेले आहे तसेच पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी भरून लोक त्या खड्ड्यांमध्ये कित्येक लोक पडलेले देखील आहे त्याबाबत शिवसाम्राज प्रतिष्ठान चेलाडी चौक नसरापूर येथील शिवसाम्राज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रज्योत कदम,उपाध्यक्ष सुरज भगत,उपसचिव नवनाथ कचरे,सौरभ शेटे,ओंकार चोरघे,प्रतिक कोंढाळकर, सुरज धोत्रे,निखिल भंडारी यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग राजगड (वेल्हे) येथील अधिकारी प्रकाश गाडे यांना वारंवार फोन करून त्याद्वारे या अडचणी बाबत सांगूनदेखील आज काम चालू होईल,उद्या काम चालू होईल असे सांगत फक्त आश्वासन देत, उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. जर येत्या दोन दिवसाच्याआत खड्डे भरून नाही झाले तर शिव साम्राज्य प्रतिष्ठान व समस्त ग्रामस्थ नसरापूर यांतर्फे मुख्य रस्त्यावर रास्ता रोको करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात आंदोलन करणार आहे,असाही इशारा देण्यात आला.


