नागठाणे कॉलेज चे सज्जनगडावर स्वच्छताही सेवा अभियान
नागठाणे (प्रतिनिधी): बजरंग चौधरी
नागठाणे येथील आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र सरकारमार्फत आयोजित *माय भारत स्वच्छता ही सेवा* या अभियाना अंतर्गत सज्जनगड येथे स्वच्छता आणि प्लास्टिक मुक्त अभियान राबविले.
हे अभियान केंद्र सरकारने १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर या कालावधीमध्ये राबविण्यात येत आहे. शिबिराच्या प्रारंभी सातारा जिल्हा युवा अधिकारी श्री स्वप्निल देशमुख यांनी शिबिरास शुभेच्छा संदेश दिला. सज्जनगडावरील पार्किंग पायऱ्या आणि गडावरील सर्व परिसरामध्ये विद्यार्थ्यांनी स्वच्छता करून प्लास्टिक तसेच प्लास्टिकच्या पाणी बॉटलचे संकलन केले.
यापूर्वी नागठाणे महाविद्यालयाने ‘माय भारत स्वच्छता ही सेवा’ या अभियानांतर्गत महाविद्यालयामध्ये तसेच सामाजिक स्तरावर स्वच्छतेवरती व्याख्याने, पोस्टर प्रदर्शन, स्मशानभूमी स्वच्छता हे उपक्रम देखील राबविले आहेत.
किल्ल्याचा इतिहास मांडताना कुलकर्णी गुरुजींनी सज्जनगडाचे ऐतिहासिक महत्त्व आणि इतिहास सांगितला. महाविद्यालयाचे प्र प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांनी सज्जनगड येथे शिबिरार्थींनी केलेल्या कामाचे कौतुक करून गड किल्ले आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी तरुणांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.
या नियोजनासाठी श्री रामदास स्वामी संस्थान, सज्जनगड आणि परळी ग्रामपंचायत यांचे सहकार्य लाभले. सदर स्वच्छता शिबिराचे नियोजन कार्यक्रम अधिकारी डॉ संदीप लोखंडे व डॉ सुनील पवार, एन.सी.सी. ऑफिसर डॉ.गणेश गभाले, प्रा.जयमाला उथळे, प्रा. शितल सालवाडगी, प्रा. संतोष सोंडगे, प्रा. भालचंद्र बिचितकर आणि संतोष पवार (पी. आय) यांनी केले. सदर शिबिरामध्ये एकूण 102 विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवून शिबीर यशस्वीपणे पूर्ण केले.


