भोर विधानसभेमध्ये वंचित ठरणार का गेमचेंजर……????
कार्यकारी संपादक: सागर खुडे
२०२४-२०२५ या होणाऱ्या पंचवार्षिक विधानसभा निडणुकीमध्ये भोर राजगड(वेल्हे) मुळशी विधानसभेत यावेळेस निवणुकीपूर्वीच सर्व पक्षांकडून जंगी तयारी करित मागील काही महिन्यापासून गावभेट संवाद दौरे, मतदारसंघातील गावागावात सभा,तीर्थयात्रा आणि होम मिनिस्टर यांसारख्या विविध प्रकारचे कार्यक्रमांचे आयोजन करून स्त्रियांवर भुरळ पाडत, राजरोस खुलेआम पैशाचा पाऊस पडत आहे,आणि त्याला सुरुवातही झालेली स्पष्ट निदर्शनास दिसते आहे. यामध्ये इच्छुक उमेदवार लाखों रुपयांची उलाढाल करत खर्च करून वेगवेगळे कार्यक्रम भोर राजगड(वेल्हे)मुळशी या मतदारसंघामध्ये घेत आहे.परंतु प्रकर्षाने पाहिलं तर कोणताही उमेदवार भोर येथील तरुणांसाठी लांबणीवर पडलेला पोटापाण्याच्या प्रश्नावर,रोजगाराच्या संधी अशा विकासाच्या दृष्टीने तालुक्याला आणि तरूणांना आर्थिकदृष्टया सधन करण्यासाठी,त्यांना आर्थिक बाजूंनी बळकट बनविण्यासाठी उपक्रम न घेता, म्हणजेच थोडक्यात विकासावर “भ्र” शब्द न काढता फक्त जनतेला फसवण्याचे काम या ठिकाणी करत आहेत अशी दबक्या आवाजात चर्चा गावागावात सुरू आहे.
भोर राजगड(वेल्हे) तालुक्यात सर्वात भयानक प्रश्न म्हणजे तरुणांना रोजगार नाही,रस्ते व्यवस्थित नाहीत, चांगल्या प्रकारे आरोग्य सुविधा नाहीत,आणि असतील तर उच्चकौशल्य प्राप्त कर्मचारी वर्ग नाही,आणि त्याअभावी शासकिय योजनांमधून मोफत आरोग्य उपचार मिळत असूनही लाखों रुपये खर्च करून खाजगी रूग्नालयात उपचार घ्याबा लागत आहे.आणि पैशाअभावी दुर्बल घटकांना आपला जीव गमावावा लागत आहे.तसेच असे उच्चशिक्षित वैद्यकिय आधिकारी व्यवस्था नसल्यामुळे आणि उपचार मिळाल्यामुळे अशा अनेक अडचणीना सामोरे जावे लागत आहे.पण या प्रश्नांवर कोणीही बोलायला तयार नाही.परंतु यावेळेस वंचित बहुजन आघाडी या प्रश्नांना न्याय देण्यासाठी पक्षाकडून मिळालेल्या या अनमोल संधीच सोन करीत एक सर्वसामान्य कुटुंबातील तरुण म्हणजेच वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष अभिषेक संतोष वैराट हे पूर्ण ताकदीने ही भोर विधानसभा लढविण्यासाठी आणि अनेक वर्षांची लुटमार सुरू असणारी घराणेशाहीची परंपरा मोडखळीत आणण्यासाठी या रिंगणात उतरले आहे.व अनेक वर्षाची घराणेशाही या ठिकाणी मोडीस काढण्याच काम करून वंचित बहुजन आघाडी याठिकाणी कबाड लावण्याचं काम नक्कीच करेल,अशी दबक्या आवाजात नागरिकांची चर्चेला उधाण येतं आहे.प्रामुख्याने ओबीसी समाज,आदिवासी समाज, आणि दलित समाज या आर्थिकदृष्टया दुर्बल असणाऱ्या समाजाला आतापर्यंत न्याय मिळालेला नाही आणि त्यांना आजही त्याच पद्धतीने जीवन व्यतीत करावे लागतं आहे यावर कुठेतरी बदल होऊन सामाजिक पातळीवर त्यांना देखील त्यांनीही त्यांच्या न्यायहक्कासाठी लढा देण्याचा आधिकार त्यांनाही आहे.त्यामुळे ही निवडणुक अत्यंत चुरशीची होण्यासाठी बहुजनांनी हातात हात घेत लढण्यासाठी कंबर कसली आहे.


