अनुगामी लोकराज्य महा अभियान (अनुलोम) संस्थेतर्गत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती जल्लोषात साजरी


कार्यकारी संपादक : सागर खुडे

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी पासून जयंती पर्यंत साजरी केल्या जाणाऱ्या समरसता पंधरवड्यामध्ये या आठवड्यात अनुगामी लोकराज्य महाअभियान (अनुलोम) या संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमांतर्गत भोर राजगड (वेल्हा) मुळशीचे नवनिर्वाचित कार्यक्षम युवा नेते श्री.किरण दगडे पाटील यांच्या सहकार्याने भोर तालुक्यातील अनंतनगर-वडार वस्ती(३५) आणि मोहरी खुर्द(२२)अशा दोन गावातील एकूण ५७ गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी समाजातील जातीभेद दूर करण्यासाठी अण्णाभाऊ साठे यांनी केलेल्या कार्याची माहिती व अनुलोमच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या सर्व सामाजिक कामाची माहिती अनुलोमचे भोरचे प्रमुख एड. मंगेश चंद्रशेखर अंबुले ( गुरव ) यांनी दिली.

ADVERTISEMENT

प्रसंगी वडार समाज अध्यक्ष दीपक पवार, प्रमुख पाहुणे प्रा.निखिल तांबे, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पवार, अनुलोमचे वस्तीमिञ सागर पंगाराकार, सुतार लोहार समाज अध्यक्ष संदीप सुतार तसेच अन्य क्षेत्रांतील मान्यवर मंडळींसह दोन्ही गावातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!