सम्राट अशोकांची जयंती उत्साहात साजरी
पुणे प्रतिनिधी | एस.एन.नांदेडकर
सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभा, पुणे यांच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सम्राट अशोक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
भिम छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शामभाऊ गायकवाड, तक्षशिला बुद्ध विहाराचे अध्यक्ष राजेश भाऊ आढाव तसेच संस्थापक अध्यक्ष विजय नाना बोकेफोडे यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर श्रेयस शिंदे यांनी सम्राट अशोक यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनांवर प्रकाश टाकला.
कार्यक्रमात सौम्य सोलंकी या बालिकेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर इंग्रजी भाषेत प्रभावी भाषण सादर केले. तसेच शामभाऊ गायकवाड व राजेश भाऊ आढाव यांनी उपस्थितांना जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
तद्नंतर उपस्थितांना लाडू वाटप करण्यात आले. तक्षशिला बुद्ध विहाराच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा तसेच लेझीम संघासाठी साऊंड फ्री उपलब्ध करून देणारे शामजी नागवी यांचा सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे नियोजन बौद्धाचार्य निलेश गायकवाड यांनी केले होते. यावेळी बाबासाहेब सोनवणे, रितेश गायकवाड, निखिल गायकवाड, धनराज बनसोडे, प्रेम कांबळे आदी उपस्थित होते.


