अखिल भारतीय श्री.स्वामी समर्थ केंद्र आध्यात्मिक विकासमार्ग दिंडोरी प्रणित महाड नाक्याजवळ बालसंस्कार केंद्र गुरुपीठ इच्छूक अनुयायांसाठी खुले.
कार्यकारी संपादक : सागर खुडे
भोर दि. २७ कलियुगाचे चालक, मालक, पालक व संचालक असणाऱ्या दत्तमहाराज म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराजांनी मूळ गुरूप्रणीत तत्वज्ञान शाश्वत स्वरूपात सर्व मानवासाठी उपलब्ध व्हावे म्हणून सदगुरु पिठले महाराजांचे (इ.स. १८७८- १९७४) गुरूपद घेऊन त्यांच्याकडून दीर्घ काळ हिमालय, प्रदीर्घ काळ त्र्यंबकेश्वर व नाशिक येथे विविध उपासना, तपश्चर्या करून घेतल्या व पुढील कार्य नियोजनासाठी आज्ञा दिली.
सदगुरु पिठले महाराजांनी सदगुरू परमपूज्य मोरेदादा (इ.स. १९२२ – १९८८) यांचे गुरूपद घेऊन स्वामी महाराजांच्य वैश्विक धर्मकार्यासाठी संपूर्ण तयारी करून घेतली. सदगुरू मोरेदादांनी मूळ गुरूप्रणित तत्वज्ञान काळानुरूप आवश्यक ते बदल करून सर्वसामान्यापर्यंत पोहचवले ते म्हणजेच दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग होय. गुरूमाऊली परमपूज्य आण्णासाहेब मोरे यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली दिंडोरी प्रणीत सेवा कार्याची व्याप्ती दिवसेंदिवस वृध्दिंगत होत आहे. आज परमपूज्य गुरूमाऊलींच्या रूपाने महाराजच कार्यरत आहेत. अशा प्रकारे तेजतत्त्वाची मूळ प्रेरणा लाभलेला श्री स्वामी समर्थ सेवामार्ग तेजातुन श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणीत) या नावाने कार्यरत असणारी सेवा केंद्रे जनहित, राष्ट्रहित, देशहित व विज्ञानाला सामोरे जावून विविध कार्य करीत आहेत. श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग हा भक्ती, ज्ञान, वैराग्य नाम, जप, तप, यज्ञ सेवा यांच्या अनुषंगाने कार्य करीत आहे. मानवास मानवधर्म व मानवी समस्या या बाबींवर मार्गदर्शन करून समस्या सोडवित आहे.
आर्त-पीडीत, दुःखितांना प्रसंगी हिंमत, धैर्य, विश्वास, सकारात्मता देऊन त्यांच्या मुखावर स्मितहास्य निर्माण करण्याचे काम परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेल्या १८ विभागातून अविरतपणे सुरु आहे. या कार्यातून ८० % सामाजिक कार्य, २० % अध्यात्म १८ विभागातून सातत्यपुर्वक केले जाते.
प्रत्येक तालुक्यातील तथा ग्रामीण भागातील तळागाळापर्यंत हा दिंडोरी प्र मार्ग समस्त सेवेकऱ्यांनी पोहचवणेचे कार्य केले आहे भोर तालुक्यातील आळंदे,शिंद,न्हावी,भोंगवली,
खेडशिवापुर इ. ठिकाणी दिंडोरी प्र साप्ताहिक केंद्र आहे तर श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र भोर ता.भोर जि.पुणे येथे दैनिक आरती सकाळी ८:०० वा-भुपाळी,१०:३० वा,६:३० वाजता नैवेद्य आरती, तसेच बालसंस्कार,पर्यावरण-प्रकृती,दुर्ग संवर्धन,विवाह संस्कार, स्वयंरोजगार विभाग, असे बहुविध प्रकारचे उपक्रम भोर महाडनाका केनॉल रोड भोर येथे चालतात.सेवा केंद्र हे तालुकास्तरीय (दिंडोरी प्र सेवा केंद्र) केंद्रबिंदू मानून काम करत आहे आणि अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालून देत आहे अंधश्रद्धेला या मार्गात अजिबात थारा नसुन डोळस श्रद्धेला मार्गात महत्त्व आहे.


