पक्षाचा आदेश झुगारून मनसैनिकांचा सुप्रिया सुळे यांना पाठिंबा.


 

राजगड प्रतिनिधी : लोकसभेच्या निवडणुकीचे पार्श्वभूमीवर देशभरात लोकसभेच्या निवडणुकीच सावट सर्वदूर पसरल असताना खुद्द मनसेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी देशाच्या उज्वल भविष्यासाठी महायुतीतील म्हणजे ट्रिपल इंजिन अर्थात शिंदे सरकार यांना पाठिंबा जाहीर केला असूनही,बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी लढविणाऱ्या उमेदवार सौ.सुप्रिया सुळे यांना मनसेचे कार्यकर्ते संतोष धसवडकर यांनी जामखेडचे आमदार श्री.रोहित पवार यांच्याशी बैठक घेऊन मनसे पक्षाचा आदेश डावलत आपला खंबीर पाठिंबा दिल्याचे समजते आहे. परंतु याच बातमीची चर्चा पदस्थांना कळताच क्षणाचाही विलंब न करता पुणे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट श्री.रवींद्र गारुडकर अध्यक्ष साहेब यांनी आपल्या पत्राद्वारे असे सूचित केलं की “पक्षाचं आदेश तोच अंतिम आदेश…!”

आणि ज्यांनी कोणी तो डावलला असेल मग त्यामध्ये त्यांनी संतोष धसवडकर आणि त्यासोबत अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शविणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांवर पक्षातून हाकलपट्टी, तसेच रितसर कारवाई करण्याचे विशेष असे सूचनापत्र जारी केल्याचे समाज मांध्यमांवर प्रसिद्ध केलेले पाहावयास मिळाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!