नामदेवराव जाधव थेट बारामती लोकसभेच्या रिंगणात….


[

मंगेश पवार

सारोळे प्रतिनिधी : राज्यात सर्वात चर्चेचा मतदार संघ म्हणजे बारामती, या बारामती मतदारसंघांमध्ये सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याबरोबरच आता जिजाऊंचे थेट वंशज असणारे तसेच इतिहास संशोधक म्हणून उभ्या महाराष्ट्रच नव्हे तर देशात ज्यांची ख्याती आहे व्यावसायिक शिक्षणावर सलग २५ वर्ष लेखन आणि व्यावसायिक मार्गदर्शन करून मराठी तरुणांना व्यावसायिक शिक्षणांबरोबरच रोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहन देणारे पाचलिंगेश्वर येथील मूळचे रहिवासी आणि पुरंदर तालुक्यातील काळदरी गावचे वास्तव्य असणारे कुलगुरू नामदेवराव जाधव हे आता लोकसभेच्या रिंगणात उतरल्याचे समजते आहे त्यांनी टेलिफोन या चिन्हाद्वारे अपक्ष राहून निवडणुक लढवणार असल्याचे सांगितले आहे.बारामती मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न असो, किंवा रोजगार,पर्यटन आणि जनसामान्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, जनसामान्यांच्या आणि तळागाळापर्यंतच्या सोसल्या जाणाऱ्या प्रत्येक अडचणींना एक अपेक्षित पर्यायी उत्तर देण्यासाठी निवडणूक लढवण्याचा मानस बाळगला असल्याचे त्यांनी झालेल्या पत्रकार परिषदेत आपले मत मांडले.

ADVERTISEMENT

जनतेने संधी दिल्यास लोकांच्या दैनंदिन जीवनातील घडामोडींचा सखोल अभ्यास करून अगदी शेवटच्या माणसापर्यंत आपले कार्य पोहोचवण्याचे, तसेच ४लाख कुटुंबातील १८ते४० वयोगटातील तरुणांना रोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहन देऊन विकास कामांचा शुभारंभ करण्याचे आवाहन त्यांनी आपल्या नियोजित कार्यप्रणालीद्वारे मांडले.यावेळी माध्यमांशी बोलत असताना त्यांनी “कामाचं कोण…?तर टेलिफोन….”

अशा प्रकारचे उद्द्घोष काढत ५०वर्षापासून प्रलंबित असलेल्या विकास कामांना दुजोरा देत एक प्रकारे खमका प्रतिनिधी या मतदारसंघाला मिळणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!