किकवी श्री छत्रपती शिवाजी विद्यालय येथे वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त फूड फेस्टिवल व रांगोळी प्रदर्शन उत्साहात


 

सारोळे :-  किकवी शिक्षण संस्था संचलित श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, किकवी, तालुका भोर, जिल्हा पुणे येथे दि. 16 जानेवारी शुक्रवारी वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त फूड फेस्टिवल व रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन  नरेंद्र मोदी (माजी तंटामुक्ती अध्यक्ष) यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी  संभाजी पाटणे (संचालक, कबड्डी असोसिएशन), विश्वासराव निगडे (माजी चेअरमन, विविध कार्यकारी सोसायटी, किकवी) तसेच वंदना अहिरे (माजी उपसरपंच, किकवी) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमास माता-पालक व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी माता पालकांसाठी हळदी कुंकाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

ADVERTISEMENT

फूड फेस्टिवलमध्ये विविध पारंपरिक व आधुनिक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. रांगोळी प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी सामाजिक, सांस्कृतिक व पर्यावरणविषयक संदेश देणाऱ्या आकर्षक रांगोळ्या साकारल्या.

कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विनोद राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपशिक्षक  राजेंद्र मोरे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, आत्मविश्वासाला व सर्जनशीलतेला चालना मिळाल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!