भोर तालुक्यातील निगडे खे.बा.शाळेतील चिमुकल्यांचा ‘माऊली गजर’ – भक्ती, एकता आणि संस्कृतीचा संगम!
पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
दि. 2 सारोळे :- शालेय गंगाजळी भक्तीमय रंगांनी नटली! निगडे खे बा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आज एक संस्मरणीय आणि संस्कारक्षम वारी अनुभवायला मिळाली.
विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मिळून पारंपरिक पद्धतीने ‘माऊलींची पालखी व ग्रंथदिंडी’ गावात काढली. वारीत सुमारे ६५ विद्यार्थी, ५ शिक्षक, १५ अंगणवाडीतील बालकं, अंगणवाडी सेविका, पालक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, तसेच गावकरी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून टाळ-मृदंगाच्या गजरात, ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ च्या जयघोषात भजन, फुगड्या, अभंग गायन यांमधून वारकरी संप्रदायाचा अनुभव उभा केला.
माऊलींच्या पालखीसोबत ‘ग्रंथदिंडी’ही नेण्यात आली, ज्यातून अध्यात्म व ज्ञान यांचा संगम घडवण्यात आला. गावातील महागणपती मंदिरात आरती आणि अभंग म्हणत वातावरण पूर्णपणे भक्तिमय झाले. त्यानंतर प्रसाद वाटप व स्वच्छता अभियान राबवून सामाजिक बांधिलकीचा परिचयही विद्यार्थ्यांनी दिला.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनोद चौधरी यांनी विद्यार्थ्यांचे विशेष आभार मानले व त्यांच्या सहभागाचे, संस्कारशीलतेचे आणि शिस्तबद्ध वर्तनाचे कौतुक करत अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
या उपक्रमाचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये एकता, समजूतदारपणा, सहकार्य आणि सामाजिक जाणीव निर्माण करणे होता. या भक्तिमय आणि सर्जनशील उपक्रमामुळे चिमुकल्यांमध्ये अनंद, उर्जा आणि संस्कार यांचा सुंदर संगम घडल
उपस्थित पालक आणि ग्रामस्थांनी शाळेच्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक करत, विद्यार्थ्यांना मिळालेल्या संस्कारांचे मन:पूर्वक अभिनंदन केले.

 
			
 
					 
							 
							