विद्यार्थ्यांच्या ‘वारी’तून वारकरी संप्रदायाची शिकवण – किकवी विद्यालयात आषाढी वारीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात संपन्न
संपादक मंगेश पवार
कार्यकारी संपादक सागर खुडे
दि. 3 सारोळे :-किकवी शिक्षण संस्था संचलित श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात बुधवार दिनांक 2 जुलै 2025 रोजी महाराष्ट्राच्या अध्यात्मिक परंपरेचा वारसा जोपासणारा आषाढी वारीनिमित्त विद्यार्थ्यांचा वेशभूषेतील वारकरी दिंडी सोहळा उत्साहात पार पडला.
या विशेष सोहळ्याची सुरुवात श्री विठ्ठल-रखुमाई आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी यांच्या पूजनाने करण्यात आली. पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक विनोद राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. सकाळी 9 वाजता विधिवत पावले विठूरायाच्या नामस्मरणात निघाली.
विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी पोशाख परिधान करत अभंग, भजन, टाळ मृदुंगाच्या गजरात “ज्ञानोबा-तुकाराम”चा जयघोष केला. किकवी गावातून काढण्यात आलेल्या दिंडीचे ग्रामस्थ आणि महिलांकडून जल्लोषात स्वागत झाले. या वेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किकवीचे मुख्याध्यापक शशिकांत गुरव यांच्या नेतृत्वाखाली शाळेतील विद्यार्थीही वारकरी पोशाखात सहभागी झाले होते. गुरव सर हे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार आणि सामाजिक भान निर्माण करणारे, उपक्रमशील व प्रेरणादायी शिक्षक म्हणून ओळखले जातात.
 
  
 
नाविन्यपूर्ण उपक्रमांतून समाजप्रबोधन
दिंडीमध्ये केवळ अध्यात्म नव्हे तर समाजप्रबोधनाचे विविध संदेश देणारे उपक्रम राबवले गेले:
ज्ञानेश्वरी पालखी मिरवणूक – ग्रंथराजाची पालखी सन्मानाने मिरवली गेली.
पर्यावरण जनजागृती – इको क्लबच्या माध्यमातून वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यात आले.
व्यसनमुक्ती, आरोग्य व रस्ता सुरक्षा – प्रहारी गटामार्फत नारे व घोषणांद्वारे जनतेला सकारात्मक संदेश देण्यात आले.
—
ग्रामपंचायतीसह समाजबांधवांचा सक्रिय सहभाग
या कार्यक्रमासाठी किकवी ग्रामपंचायत सरपंच नवनाथ कदम, खरेदी विक्री संघ संचालक नवनाथ भिलारे, संस्थेचे कार्याध्यक्ष राजेंद्र निगडे, माजी सरपंच सौ. सुनंदाताई भिलारे, माजी सैनिक श्री. शिवाजी नाना कोंढाळकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किकवीचे मुख्याध्यापक शशिकांत गुरव सर, ग्रामपंचायत कर्मचारी अशोक राऊत, तसेच गावातील महिला, युवक मंडळ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल विद्यालयाच्या वतीने सर्व मान्यवरांचे व ग्रामस्थांचे आभार मानण्यात आले.

 
			

 
					 
							 
							