१ देशी पिस्टल, २ जिवंत काडतुसे व मोटार सायकल असा १,२०,४००/- मुद्देमाल शिरवळ पोलिसांनी केला जप्त.


 

खंडाळा प्रतिनिधी :

 

राहुल धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग फलटण यांनी लोकसभा निवडणुक प्रक्रिया २०२४ चे अनुशंगाने पोलीस ठाणे हददीत सक्त पेट्रालिंगचे करण्याबाबतचे सुचना देण्यात आलेल्या होल्या.

पोलीस निरीक्षक संदीप जगताप, पोलीस उप निरीक्षक सतीश आंदेलवार व पोलीस ठाणेचे

अंमलदार असे शिरवळ पोलीस ठाणे हददीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, शिरवळ गावचे हददीत पळशी रोडला दोन संशयित इसम धनलक्ष्मी रेसिडेंटच्या पार्किंग आवारात संशयीतरित्या फिरत आहेत. अशी माहिती प्राप्त

शिरवळ पोलीस ठाणे स्टाफसह मिळाले बातमीचे ठिकाणी पोहचले, त्यावेळी तेथे होन्दा युनिफॉर्न मो.सा.क्र. एम.एच.०२ डी.डी. ५९३० या गाडीवर बसून होते. त्या इसमांची हालचाल संशयास्पद जाणविल्याने त्यास त्याचे नाव, गाव विचारले असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्याचे हावभाव व हालचाली संशयास्पद वाटुन त्याचे जवळ असले कापडी पिशवी दिसुन आली तेव्हा त्या पिशवीची पाहणी केली असता त्या मध्ये १ लोखंडी स्टीलचे गावठी बनावटीचे पिस्टल, २ जिवंत काडतुसे व मोटार सायकल असे सुमारे १,२०,४००/- रु किमतीचा मुददेमाल मिळुन आल्याने त्यांचे विरुदध शिरवळ पोलीस

ADVERTISEMENT

ठाणे १३७/२०२४ शस्त्र अधि. १९५९ चे कलम ३ (१), ७,२५ प्रमाणे गुन्हा नोद केला आहे.

माहे नोव्हेंबर २०२२ पासुन ८० देशी बनावटीची पिस्टल, ३ बारा बोअर रायफल, १८७ जिवंत

काडतुसे व ३७७ रिकाम्या पुंगळ्या जप्त करण्यात आले आहे. राहुल धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग फलटण याचे सूचनाप्रमाणे पोलीस निरीक्षक संदीप जगताप, पोलीस उप-निरीक्षक सतीश आदलवार, शंकर पांगारे, सहा. पोलीस फौजदार पावरा, पो.हवा. सचिन वीर, जितेंद्र शिंदे, प्रशांत धुमाळ, पो. कॉ. मंगेश मोझर, सूरज

चव्हाण यांनी सदरची कारवाई केली

 

 

आरोपीची नावे :- १) दिपक संतोष पाटणे वय २२ वर्षे, रा. विंग ता. खंडाळा, जि.सातारा

 

(२) ओम सतिष कदम वय १९ वर्षे, रा. लोणी ता. खंडाळा, जि.सातारा


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!